आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुलींचे कपडे नव्हे, आपली मानसिकता बदला', हार्वर्डच्या विद्यार्थीनींचे कॅम्पेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - कॅम्पेनच्या आयोजक दिशा वर्मा

हे छायाचित्र टम्बलर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर सुरू असलेल्या एम्बॉडी इंडिया कॅम्पेनचे आहे. हॉर्वर्ड विद्यापीठात शिकणा-या भारतीय विद्यार्थ्यांनी याची सुरुवात केली आहे. या कँपेनद्वारे भारतात बलात्कार आणि लैंगिक शोषणासंदर्भातील मुद्यांवर चर्चेला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कॅम्पेनद्वारे महिला आणि मुलींच्या वेशभुषेबाबत लोकांचा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. फोटो कॅम्पेनद्वारे कॉलेजचे डीन राकेश खुरानासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांची मते मांडली आहेत.

कॅम्पेनमध्ये सहभागी असलेली हॉर्वर्डची विद्यार्थिनी उपासना शर्मा म्हणाली की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात महिलांच्या चारित्र्याबाबत त्यांच्या कपड्यांवरून अंदाज बांधला जातो. उपासनाने या मानसिकतेचा विरोध करच कॅम्पेनसाठी ''not needed: your value judgement'' (तुमच्या सल्ल्याची काही गरज नाही) च्या साइनसह फोटो पोस्ट केला. यात सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे मत असेच आहे. भारतात महिलांबाबत मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही उपासना म्हणाल्या. जगभरातील विद्यार्थ्यांना या कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेत त्याला आणखी मोठे स्वरुप देण्याचा त्यांचा विचार आहे.
पुढे पाहा : या कॅम्पेनसाठी काढण्यात आलेले PHOTO's