आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल म्हणाले, प्रदूषणाबाबत खट्टर यांची भेट सकारात्मक, CM अमरिंदर यांची अनुपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याआधी केजरीवालांनी हरियाणात जाळण्यात येणारा शेतातील कचरा दिल्लीच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. - Divya Marathi
याआधी केजरीवालांनी हरियाणात जाळण्यात येणारा शेतातील कचरा दिल्लीच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे म्हटले होते.
पानिपत - दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणावर अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी हरियाणाचे सीएम मनोहरलाल खट्टर यांची चंदिगडमध्ये भेट घेतली. मीटिंगनंतर केजरीवाल म्हणाले, "आमच्या मध्ये खूप सकारात्मक चर्चा झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलू." या मीटिंगसाठी पंजाबचे सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांनी मंगळवारी नकार दिला. याआधी केजरीवाल म्हणाले होते की, दिल्लीची एअर क्वालिटी खराब असण्याचे कारण म्हणजे हरियाणा-पंजाबात जाळण्यात येणारा शेतीतील कचरा आहे. मागच्या काही दिवसांत दिल्लीतील वायूप्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले होते.
 
समस्येतून मार्ग काढू...
- दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये शेतीतील काडीकचरा जाळण्याचा मुद्दा आणि प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर चर्चा केली. यादरम्यान खट्टर म्हणाले की, यापुढेही आम्ही खुल्या दिलाने चर्चेसाठी तयार आहोत.
- दुसरीकडे, मंगळवारी हरियाणा सरकारचे अधिकारी या मीटिंगच्या तयारीत असल्याचे दिसले. पर्यावरण, पंचायत आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी जैवकचरा आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व डेटा काढला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...