आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावती : दीपिकाचे शिर कापणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या BJP नेत्यांचा राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - पद्मावती चित्रपटाबाबतच्या वादावर पडदा पडण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. या प्रकरणी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये करणारे हरियाणा बीजेपीचे चीफ मीडिया कॉर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी बुधवारी राजीनामा दिला. दीपिका पदुकोण आणि संजय लीला भंसाळींचे शिर कापणाऱ्याला 10 कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यावर पक्षाने त्यांच्याकडे उत्तर मागितले होते. तेव्हा त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांना राजीनामा पाठवला. अशीही चर्चा आहे की, सूरजपाल अम्मू आणि करणी सेनेला वेळ दिल्यानंतरही सीएम मनोहरलाल खट्टर त्यांना भेटले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. 


'सीएम भेटले नाही हा राजपूत समाजाचा अपमान'
- मंगळवारी दिल्लीमध्ये राजपूत करणी सेना आणि मनोहरलाल खट्टर यांच्यात भेट होणार होती, पण ती होऊ शकली नाही. 
- करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भवानी सिंह, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर 22 प्रतिनिधी ठरलेल्या वेळी पोहोचले होते, पण मुख्यमंत्री मागच्या दरवाजाने निघून गेले. 
- त्याबाबत अम्मू म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राजपूत समाजाचा अपमान केला आहे. राजपूत समाज तो सहन करणार नाही. 
- त्यांनी इशारा दिला की, आगामी काळात हरियाणा सरकारला याची किंमत मोजावी लागेल. त्यांनी संघाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. 

 

ममतांबाबतही केले होते वादग्रस्त वक्तव्य.. 
- ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल 'पद्मावती' आणि त्यातील कलाकारांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे म्हटले होते. असे करून आनंद होईल असेही ममता म्हणाल्या होत्या. 
- त्यावर पलटवार करतान अम्मू म्हणाले होते की, अशा महिला शृपनखाप्रमाणे राक्षसी प्रवृत्तीच्या असतात. त्यांच्यावर लक्ष्मणाने नाक कापूनच उपचार केला होता. ममता यांनी हे विसरू नये. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पद्मावतीच्या वादावर काय म्हणाली होती दीपिका... 

बातम्या आणखी आहेत...