आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana Chief Minister Bhupinder Singh Hooda News In Marathi

मोदींवर विश्वास हीच चूक, पानिपतमध्ये जाहीर सभेत हुड्डांचे टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत- पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला हीच खरी चूक झाली, अशा शब्दांत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी पंतप्रधानांच्या सभेदरम्यान झालेल्या अपमानाचे शल्य बोलून दाखवले.

हरियाणात या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यानिमित्त हुड्डा यांनी पानिपतहून प्रचारास प्रारंभ केला. या सभेत त्यांनी केथलमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या अपमानावरच त्यांनी अधिक भाष्य केले. हा अपमान मुख्यमंत्री म्हणून माझा नाही, हरियाणाचाच तो अपमान आहे, असे हुड्डा म्हणाले.

गुप्तचर संस्थांनी मोदींच्या सभेदरम्यान गोंधळ होण्याची शक्यता असल्याचा इशारा आपल्याला पूर्वीच दिला होता, अशी माहितीही हुड्डा यांनी जाहीर सभेत दिली. भाजपची मंडळी पंतप्रधानांची प्रतिष्ठा राखतील, असा विश्वास वाटत होता. मात्र, तसे घडले नाही. हरियाणाच्या झालेल्या या अपमानाचा बदला मतांच्या माध्यमातून घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेस सोडून सध्या भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या नेत्यांवरही हुड्डा यांनी आसूड ओढले. या नेत्यांना जनता धडा शिकवेल, असे ते म्हणाले. या सभेत हुड्डा यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकारने साडेनऊ वर्षांत केलेल्या कामांचे प्रगतीपुस्तक मांडले. आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देऊ, असेही ते म्हणाले.

मनरेगासारखी रोजगार योजना व अन्न सुरक्षा योजनेला हात लावला तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हुड्डा यांनी दिला. राज्यात निवृत्तिवेतनाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सर्वच योजनांची रक्कम १ हजारावरून दीड हजार रुपये करण्याची घोषणा हुड्डा यांनी केली.