आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे हरियाणा काँग्रेसला पैशाची चणचण, प्रदेश कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - हरियाणा काँग्रेसला पैशाची निकड भासू लागली आहे. प्रदेश कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार थकले आहेत. याआधी दिवाळीला कर्मचाऱ्यांना पगार मिळाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात काही कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळालेला नव्हता. या आर्थिक टंचाईचे कारण नोटाबंदीबरोबरच विद्यमान आमदार आाणि माजी आमदारांनी पक्षनिधीत काहीच मदत केलेली नाही, असेही कारण सांगण्यात येते.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग कमेटीच्या शिफारशीप्रमाणे प्रत्येक आमदारास वर्षातून एक पगार प्रदेश कार्यकारिणीस निधी म्हणून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे माजी आमदारांनाही वर्षातून एक पेन्शन पक्षनिधीत जमा करणे अनिवार्य आहे. परंतु मागील ३ वर्षांपासून आमदार आणि माजी आमदारांनी पक्षनिधी देणे बंद केले आहे. पंजाबमध्येही अशीच परिस्थिती आहे.

ट्रस्टचा पैसा व्होरांनी नेला : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काँग्रेस सरकारच्या काळात इतर प्रदेशाप्रमाणे हरियाणा काँग्रेस भवन ट्रस्ट स्थापन करण्यात आला. यात सुमारे २ कोटी रुपये जमा होते. परंतु राष्ट्रीय कोशाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी ट्रस्टचा निधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये वळता केला. प्रदेश कार्यालयास या निधीची गरज नाही, असे त्यांचे मत होते.

हुड्डा आणि तंवरमध्ये वितुष्टाचा परिणाम
काँग्रेसचे १५ पैकी १२ आमदार माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या सोबत आहेत. हुड्डा आणि तंवर यांच्यात वितुष्ट आल्याचे कोणापासून लपून राहिलेले नाही. परंतु माजी आमदारांनीही पेन्शनची रक्कम पक्षनिधीत जमा न केल्याने विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांचा वचक नसल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार किरण चौधरी यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, पक्षनिधीचा हिशेब ठेवणे आणि निधी घेणे प्रदेश कार्यालयाचे काम आहे.
निधी गेला कोठे
फेब्रुवारी - २०१४ मध्ये जेव्हा पद सोडले तेव्हा ७ कोटींहून अधिक पक्षनिधी शिल्लक होता. पंजाब प्रदेश कार्यकारिणीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नसल्याची माहिती आहे. परंतु अलीकडे काही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे खर्च जास्त होण्याची शक्यताही नाही. मग निधी गेला कोठे? रक्कम आल्याची व गेल्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
फुलचंद मुलाना, माजी प्रदेशाध्यक्ष, हरियाणा काँग्रेस
नोटाबंदीमुळे अडचण
पक्षात आजही ४० लाख रुपये निधी आहे. कर्मचाऱ्यांना नेहमी १ तारखेस पगार दिला जातो. या वेळी नोटबंदीमुळे अडचण आली. कारण बँकांतून पैसे मिळत नाहीत. मात्र, आजी व माजी आमदारांकडून पक्षनिधी मिळत नाही, हेही खरे आहे.
तरुण भंडार, हरियाणा काँग्रेसचे कोशाध्यक्ष
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...