आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणातील जळीतकांड CBI कडे, सुनपेडमध्ये नेत्यांची रीघ, आंदोलकांवर लाठीमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामस्थांनी महामार्गावर मुलांचे मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. - Divya Marathi
ग्रामस्थांनी महामार्गावर मुलांचे मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.
फरिदाबाद / चंदिगड - हरियाणात सोमवारी रात्री वैभव आणि १० महिन्यांची दिव्या यांना जिवंत जाळल्यानंतर सुनपेड येथील संतप्त नागरिकांनी आरोपींची अटक आणि निष्काळजी वर्तन करणारे पोलिस यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याच्या आणि तपास सीबीआयकडे द्यावा, या मागणीसाठी आंदोलन केले. धरणे देणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

बुधवारी दोन्ही मुलांचे मृतदेह बर्फाच्या तुकड्यांवर ठेवून वल्लभगढ-फरिदाबाद महामार्गावर धरणे आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. तणाव आणि आक्रोशामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दौरा रद्द केला. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी शिफारस केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माकपच्या नेत्या वृंदा करात आणि आपचे नेते आशुतोष यांच्यासह अनेक नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी बिहारचा निवडणूक दौरा रद्द करून आपल्या संसदीय मतदारसंघात परत आले. ११ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीबीआय तपासाची मागणी मान्य झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासहा वाजता मुलांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनपेडमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे.

यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक
सकाळी १० वाजता सुनपेडला आलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक महंमद अकील यांनी घटनेची चौकशी केली. पीडितांची भेट घेतल्यानंतर ,‘ही घटना संशयास्पद आहे,’ असे वक्तव्य त्यांनी माकपच्या माजी खासदार वृंदा करात यांच्यासमोर केले. त्यामुळे संतप्त पीडितांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. नंतर पुरुष आणि स्त्रिया पायीच बायपास रोडला गेल्या आणि त्यांनी रास्ता रोको केला.

दोन्ही मृतदेह नेले आंदोलनस्थळी
वैभव आणि दिव्या यांचे मृतदेह दुपारी एक वाजता सुनपेडला आणण्यात आले. मृतदेह रास्ता रोको आंदोलनाच्या स्थळी नेण्यात आले. लोकांनी पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
पुढे वाचा.. माध्यमांच्या प्रश्नामुळे राहुल गांधी संतप्त