आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर परतली डान्सर सपना चौधरी, सुसाईडच्या प्रयत्नानंतर पहिल्यांदाच लोकांना लावले वेड, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादुरगड (हरियाणा) - डान्‍सर आणि रागिनी शैलीची गायिका सपना चौधरीने विष पिऊन काही दिवसांपूर्वी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला होता. तिच्‍यावर नजफगडमधील एका रुग्‍णालयात उपचार करण्यात आले. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. आता ती स्टेजवरही परतली आहे. तिने एका कार्यक्रमात भन्नाट डान्स करुन उपस्थित लोकांना चक्क वेड लावले. संबंधित प्रकरणाने तिच्या लोकप्रियतेत जराही घट झालेली नाही.
एका गाण्‍यामुळे काही महिन्‍यांपासून तिच्‍यावर टीका होत आहे. शिवाय एका फेसबूक पेजवर तिच्‍यावर अश्‍लील - अश्‍लील कंमेटही येत होत्‍या. त्‍या वाचून आपली जगण्‍याची इच्‍छा संपल्‍याचे तिने सुसाइड नोटमध्‍ये लिहिले होते.
नेमका काय आहे वाद...
सपनाने तीन महिन्‍यांपूर्वी गायिलेल्‍या एका गाण्‍यातून दलितांचा अपमान झाला, असा आरोप तिच्‍यावर आहे. या प्रकरणी 'निगाहें' या सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष नबाव सतपाल तंवर यांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे गुडगाव पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला.
- यापूर्वी तिच्‍याविरुद्ध डोगरान पोलिस चौकीतही तक्रार दिली गेली होती.
- या तक्रारीत म्‍हटले, गुडगावच्‍या चक्करपूर परिसरात झालेल्‍या एका कार्यक्रमात सपना आणि तिच्‍या पथकाने रागिनी शैलीमध्‍ये 'जात-पात का बिगड़ग्या' हे गीत गावून दलितांचा अपमान केला. - या गीतात जातीवाचक शब्‍द होते.
- सपनाचे हे वादग्रस्‍त गाणे यू-ट्यूबवरही अपलोड केले गेले.
- या प्रकरणी संजय चौहान नावाच्‍या एका युवकानेही तक्रार दिली होती.

सपनाने सुसाइड नोटमध्‍ये काय लिहिले होते
- सतपाल तंवर याने माझी बदनामी केली, असा आरोप सपनाने सुसाइड नोटमध्‍ये केला.
- कट रचून माझ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यापूर्वी अनेक गायकाने हे गाणे गायलेले आहे. त्‍यांच्‍यावर कुणीच आक्षेप घेतला नाही. एवढेच नाही तर मी माफीसुद्धा मागितली होती. तरीही फेसबूकवर मला शिव्‍या घातल्‍या जात आहेत. माझ्या चरित्रावर संशय घेऊन कंमेट केल्‍या जात आहेत. त्‍यामुळे मी त्रस्‍त झाली आहे.
- या प्रकरणी मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मला न्‍याय मिळवून द्यावा, अशी मागणीसुद्धा तिने केली आहे.
या पोस्‍टमुळे सपना झाली खूप व्‍यथित ?
सपनाने सुसाइड नोटमध्‍ये लिहिले, ''आज सकाळी मी फेसबूकवर एक पेज पाहिले. यावर लिहिले होते, सपना चौधरीची धमकी- नेते आणि अधिकाऱ्यांना करेल भोंगळे. ' यात मला धरून खूप काही आक्षेपार्ह लिहिलेले होते. त्‍यामुळे मी खचून गेली.
- त्‍यातील मजकूर वाचून मी आतल्‍या आत मरून गेली. माझ्यावर उडवलेले शिंतोडे पाहून जगण्‍याची इच्‍छा संपली. या पेजवर लिहिले होते, मोठे अधिकारी माझ्या शरिराशी खेळतात. स्टेजवर मी श्रोत्‍यांना खूश करते तर रात्री मंत्री आणि अधिकाऱ्यांना. पण, मी असे काहीही केलेले नाही.
- सतपाल तंवरनेच मला बदनाम करण्‍यासाठी हा कट रचला आहे, असा आरोपही तिने केला.
कशी झाली एका रात्रीतून स्टार
- छोटे-छोटे कार्यक्रम करणाऱ्या सपनाचा एक व्हिडिओ मोर म्यूझिक कंपनीने गेल्यावर्षी जुलैमध्ये यू-ट्यूबवर अपलोड केला होता.
- ते गाणे होते 'सॉलिड बॉडी'. 'सॉलिड बॉडी' यू-ट्यूबवर अपलोड केल्यानंतर एका महिन्यात या गाण्याला लाखो हिट्स मिळाले होते.
- व्हिडिओ हिट झाल्यानंतर सपना रात्रीतून स्टार झाली आणि ठिकठिकाणांहून तिला कार्यक्रमाचे निमंत्रण येऊ लागले.
सुसाइट अटेंप्टनंतर तिचे गाणे 10 लाख लोकांनी पाहिले
- सपनाने 4 नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून गुगलवर 50 हजार लोकांनी सपना चौधरीला सर्च केले.
- सपनाचे 'सॉलिड बॉडी' गाणे यू-ट्यूबवर आधीपासून हिट होते, मात्र सुसाइड अटेंप्टनंतर तिच्या इतरही गाण्यांना 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले.
- गेल्या महिन्यापर्यंत या गाण्याला 40 लाख वेळा पाहिले गेले होते, आता ते गाणे 50 लाख लोकांनी पाहिले आहे.
- गुगलवर सपनाला सर्च करणाऱ्यांमध्ये हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदिगडमधून सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सपनाने लिहिलेली सुसाइट नोट आणि फोटोज... अखेरच्या स्लाईडवर बघा अशी स्टेजवर परतली सपना चौधरी... लोकांना लावले वेड....
बातम्या आणखी आहेत...