आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहाल म्हणजे निव्वळ सुंदर कब्रस्तान, घरात प्रतिकृती ठेवणेही अपशकुण; हरियाणाचे मंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल विज हरियाणाचे आरोग्य मंत्री आहेत. - Divya Marathi
अनिल विज हरियाणाचे आरोग्य मंत्री आहेत.
अंबाला - जगातील मोजक्या आश्चर्यांपैकी एक आणि सौदर्याचे प्रतिक ताजमहालला वाइट ठरवण्याच्या राजकीय टीका टिप्पणींच्या शर्यतीत आता हरिणाच्या मंत्र्यांनीही उडी घेतली. हरियाणात मंत्री असलेले अनिल विज यांच्या मते, ताजमहाल केवळ एक सुंदर कब्रस्तान आहे. तसेच याची प्रतिकृती घरात ठेवणे सुद्धा एक अपशकुण असल्याचे विज म्हणाले आहेत. 
 
 
>> हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ट्वीट केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये सुद्धा ते आपल्या वक्तव्यावर ठाम होते. ताजमहाल एक कब्रस्तान असल्याने लोक त्याची प्रतिकृती सुद्धा घरात ठेवत नाहीत. अशा प्रकारच्या प्रतिकृती घरात ठेवणे ते अपशकुण मानतात असा दावा वृत्तसंस्थेशी संवाद साधताना विज यांनी सांगितले. 
>> उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताचा जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा ताजमहलला यापूर्वी भाजप आमदार संगीत सोम यांनी आपल्या संस्कृतीवरील डाग म्हटले आहे. तर, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या टुरिस्ट टेस्टिनेशनच्या पत्रिकेत ताजमहल समाविष्ट केलेच नाही. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत, राज्याच्या कॅलेंडरवर ताजमहलाचे फोटो जारी केले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...