आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana: Husband's Body 10 Pieces And Wife Was Watching TV

हरियाणा: पतीचे दहा तुकडे करुन पत्नी प्रियकरासोबत पाहात होती TV

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादूरगड (हरियाणा) - दिल्लीपासून जवळ असलेल्या बहादूरगड मधील आसंडा गावात पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे कबूल केले असून हत्येनंतर दोन रात्र तीन दिवस मृतदेहासोबत राहिल्याचा खुलासा केला आहे. 24 एप्रिल रोजी हे हत्याकांड घडले आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

धड ठेवले सुटकेसमध्ये, शीर खड्ड्यात पुरले
- आरोपी पत्नी पूजाने सांगितले, की तिचा पती बलजीत (35) दिल्ली पाणीपुरवठा विभागात नोकरी करत होता. 24 एप्रिलच्या रात्री ती तिचा प्रियकर आशूसोबत घरात झोपली होती, त्याचवेळी पती घरी आला. आशू आणि बलजीतमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
- त्यानंतर तिचा प्रियकर आशू घरातून पळून गेला. पूजाने दह्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि ते बलजीतला खाण्यास दिले. त्यानंतर तिने प्रियकराला बोलावून घेतले.
- आशू आपल्या तीन साथीदारांसह पूजाच्या घरी पोहोचला. त्यासर्वांनी मिळून ओढणीने बलजीतचा गळा आवळून त्याची हत्या केली.
- पूजा 24 आणि 25 एप्रिलच्या रात्री बलजीतच्या मृतदेहासोबत घरातच प्रियकर आशूसोबत टीव्ही पाहात बसली होती. 26 एप्रिलला सकाळी आशू आणि तिने बलजीतच्या मृतदेहाचे 10 तुकडे केले.
- बलजीतचे धड, हात आणि पाय एका सुटकेसमध्ये ठेवले. त्याचे शीर त्यांनी घरातच खड्डा खोदून पूरले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा उघड झाला गुन्हा