आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS अधिकार्‍यावर लैंगिक शोषणाचा आरोप, पीडितेसोबत केला डान्स, व्हिडिओ झाला Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओत पीडितेसोबत नाचताना हरियाणातील वरिष्ठ आयएएस अधिकारी)
चंदीगड- हरियाणातील वरिष्ठ आयएएस अधिकारी सिद्धिनाथ रॉय यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहे. याप्रकरणी चंदीगड पोलिसांनी चौकशी सुरु केली असून रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, रॉय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओत रॉय पीडित महिलेसोबत डान्स करताना दिसत आहेत.
पीडितेने चीफ सेक्रेटरी डी.एस.ढेसी यांच्याकडे आयपीएस अधिकारी रॉय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची ढेसी यांनी दखल घेऊन डीजीपी यशपाल सिंघल यांना माहिती दिली. डीजीपी क्राइम डॉ.के.पी.सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
आयजी चारू बाली यांनी पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडितेने स्पष्ट नकार दिला. हरियाणा पोलिसांवर विश्वास नसल्याचे पीडिते म्हटले आहे. कारण, आरोपी हा वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. त्यामुळे तिची तक्रारीकडे गांर्भियाने लक्ष दिले जाणार नाही, अशी पीडितेने भीती व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत चंदीगड पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केले शारीरिक संबंध...
पीडित महिलेने मीडियासमोर सांगितले की, सोनीपत येथील रहिवासी सुरेंद्र पवार याने आयएएस अधिकारी रॉय याच्याशी ओळख करून दिली होती. एक अधिकारी म्हणून रॉयने पीडितेला तिच्या नवर्‍यापासून घटस्फोट घेण्याच्या कामात मदतही केली. त्यामुळे रॉय आणि पीडितेमधील जवळीकता वाढली.
'मला विश्वासात‍ घेण्यासाठी रॉयने सांगितले की, त्याचाही घटस्फोट झाला आहे. पत्नीसोबत आता त्याचा काही एक संबंध नाही. त्यामुळे रॉयने मला लग्नाची मागणी घातली. मीही ती मान्य केली. या दरम्यान, रॉयने माझ्यावर अनेकदा अत्याचार केले. त्याने मला पंचकूला सेकटर-19 मधील एका बंगल्यात ठेवले होते. तेथे नोकर आणि त्याचे कुटुंबीय राहात होते. परंतु, रॉयने आता विवाहास स्पष्‍ट नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्याला मारहाणही केल्याचे पीडितेने सांगितले.
पीडितेने सांगितले की, अडीच महिन्यांपूर्वी तिने पंचकूलामधील सेक्टर-19 पोलिस ठाण्यात रॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी हे प्रकरण दडपले. हरियाणाचे मुख्य सचिव आणि डीजीपींकडे पुन्हा तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर कार्यवाही झाली.
दरम्यान, रॉयने पीडितेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण दाखवलेल्या सहानुभूतीचा पीडितेने गैरफायदा घेतला आहे. पंचकुला सेक्टर-19 मधील माझा बंगला हडपण्याचा‍ तिचा प्रयत्न आहे. मला ती वारंवार ब्लॅकमेलही करत असल्याचे रॉयने म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मला प्रकरणाची माहिती नव्हती
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर यांनी सांगितले की, मला या प्रकरणाबाबत मंगळवारी समजले. पोलिसांनी मार्च महिन्यात आयएएस अधिकारी रॉय विरोधात त‍क्रार दाखल करून हे प्रकरण सरकारकडे सोपवायला हवे होते. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पीडितेसोबत डान्स करताना आयपीएस अधिकार्‍याचा व्हिडिओ आणि स्क्रीन शॉट...