आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणामध्ये जाटांचे हिंसक आंदोलन, 13 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत इंटरनेटवर बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिंद - जाटविरोधी खासदार राजुकमार सैनी आणि जाट नेते यशपाल मलिक यांची रविवारी होणारी सभा पाहता, राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बॅन करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून सरकारने अतिरिक्त फौजफाटा मागवला आहे. दुसरीकडे शुक्रवारी सैनी यांच्या रॅलीच्या विरोधात संदीप भारतींच्या नेतृत्त्वात जाट बांधव रस्त्यावर उतरले. त्यावेळी जाट आंदोलक आणि पोलिस एकमेकांशी भिडले त्यात सहा जण जखमी झाले. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे. 


या जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद 
- जिंद, हांसी, भिवानी, हिसार, फतेहाबाद, करनाल, पानीपत, कैथल, सोनीपत, झज्जर, रोहतक आणि चरखी दादरीमध्ये सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद असेल. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) एसएस प्रसाद यांनी ही ऑर्डर जारी केली. 


असे आहे प्रकरण..
- ओबीसी खासदार राजुकमार सैनी यांनी जाट वगळता 35 समाजातील बांधवांना एकत्र केले आहे. जाटांप्रमाणेच या समाजांनाही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी रविवारी जिंदमध्ये एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
- जाट नेते यशपाल मलिकही रविवारच रोहतक जिल्ह्याच्या जसियामध्ये एक मोठी रॅली करत आहेत. 
- दुसरीकडे आझाद किसान मिशनचे प्रमुख संदीप भारती सैनी यांच्या रॅलीला विरोध करत आहेत. ते शुक्रवारी शेकडो आंदोलकांसहल जिंद-कैथल हायवेवर धरणे आंदोलनाला बसले. 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यात दोन पोलिसांसह सहा जखमी झाले. 
- पोलिसांच्या कारवाईनंतर आता जाट आंदोलक जिंदच्या कंडेला गावात जमले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...