आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हरियाणामध्‍ये काय आहे परिस्‍थ‍िती, कशी भडकली हिंसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक/ पानिपत - हरियाणामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून जाट समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक रूप धारण केले. दरम्‍यान, आतापर्यंत लष्‍कर आणि पोलिसांच्‍या गोळीबारात पाच जण ठार झाले असून, 50 जवळपास जखमी आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. अर्ध्‍या राज्‍यात सध्‍या अराजकता असून, रोहतक, सोनीपत, पानीपत, हिसार, जींद, भिवानी, रेवाडी, झज्जर, फरीदाबाद, करनाल, फतेहाबाद आणि सिरसा सह राज्‍यातील 15 जिल्‍ह्यांत नॅशनल, स्टेट आणि लिंक रोड पूर्णपणे ब्लॉक करण्‍यात आले. रेल्‍वे रुळांवर आंदोलकांनी ताबा मिळवाला. लष्‍कराला पाचारण करण्‍यात येऊनही हिंसाचार सुरूच आहे.
राज्‍यातील वाहतूक ठप्‍प ...
920 पेक्षा अधिक बस आणि रोहतक-दिल्ली-हिसार, रेवाडी-हिसार-दिल्ली, पानीपत-रोहतक रेल्‍वे ट्रॅक ठप्‍प आहे. 300 पेक्षा अधिक रेल्‍वेगाड्या थांबल्‍या आहेत. रोहतक, हिसार, जींद, भिवानीमध्‍ये दूध, भाजी, पेट्रोल, गॅस सिलिंडर यांची विक्री सुरू झाली आहे.
बारावीची परीक्षा रद्द
या आंदोलनामुळे सर्व सामान्‍य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, 20 फेब्रुवारीपासून होणारी बारावीची परीक्षा हरियाणा शिक्षण मंडळाने रद्द केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर फोटोज.....................