आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणा खाप पंचायतीची मुलींच्या नृत्यावर बंदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हरियाना खाप पंचायतीने मुलींच्या नृत्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नृत्याच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मुलींनी सहभागी होऊ नये, असे जिंद जिल्ह्यातील खाप पंचायतीने शुक्रवारी जाहीर केले आहे. शाळेमध्ये होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांमधील नृत्यांमध्ये विद्याथिर्नींनी सहभाग होऊन नृत्य करण्यास किनाना गावातील खाप पंचायतीने बंदी घातली आहे. महिलांची छेडछाड व बलात्काराच्या घटना घडत आहेत. यामुळेच पंचायतीने नृत्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आल्याचे पंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.