आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे या संताच्या आश्रमाचे दृश्यः गच्चीवर कमांडो, तर चोहोबाजूस पोलिसांचा वेढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आश्रमाच्या गच्चीवर आणि भिंतींवर तैनात होते रामपाल यांचे खासगी कमांडो

हिसार -
संत रामपाल यांच्या सुरक्षेसाठी रविवारी त्यांच्या सतलोक आश्रमाला पुर्णपणे छावणीच्या रुपात बदलण्यात आले. आश्रमाच्या बाहेर पोलिस आणि आत रामपाल यांच्या अनुयायांनी मोर्चाबंदी केली होती. आश्रमाच्या गच्चीवर आणि भिंतींवर हातात काठ्या आणि बंदूका घेऊन बाबांचे कमांडो तैनात होते. तर दुसरीकडे 40 हजार जवानांसोबत पोलिसांची सेनासुध्दा तयारीत होती. जसजशी संध्याकाल होत आली तसे पोलिसांनी नमते घेतले आणि थोड्या वेळाने सर्व पोलिस परतले. असे म्हटले जात आहे की, पोलिस अधिकार्‍यांमध्ये आणि आश्रमाच्या व्यवस्थापकांमध्ये तडजोड झाल्याने पोलिसांनी माघार घेतली. मात्र आज रामपाल कोर्टात हजर होणार आहेत की नाही याबद्दल असूनही साशंकताच आहे.

प्रशासनाला नवीन दिवसाची अपेक्षा
रविवारी संध्याकाळी आश्रमाच्या आजूबाजूला पोलिस फोर्स फिरत असताना सरकारी अधिकार्‍यांशी आश्रमाच्या व्यवस्थापकांनी तीन वेळा संवाद साधला. सर्वात पहिले बरवालाचे भाजपनेते सुरेंद्र पूनीया यांनी संपर्क साधला. त्यांनी कमेटीचे प्रवक्ते राजकपूर यांची प्रशासकीय अधिकार्‍यांशी भेट घालून दिली. त्यानतंर महम चौबीसीचे नेते शमशेर खरकडा यांनी आश्रमाबाहेर कमेटीच्या सदस्यांशी बराच वेळ संवाद साधला. संध्याकाळी भाजप नेते बलराज कुंडूसुध्दा घटनास्थळी पोहोचले. जवळपास 45 मिनिटे सुरू असलेल्या या चर्चेनंतर ते परतले. कुंडू म्हणाले की, आमची चर्चा सकारात्मक ठरली. सकाळपर्यंत तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, आश्रमाबाहेरील दृश्य...