आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिमचा बनावट पासपोर्ट सापडला, मंगळवारी ED-IT करणार सिरसा डेराची पाहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला/सिरसा - साध्वी बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम याचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंचकुला पोलिसांना हनीप्रीतने सांगतल्यानुसार, राजस्थानमधील गुरसर मोडिया येथून एक सुटकेस सापडली. त्यामध्ये राम रहिमचे दोन पासपोर्ट आढळले आहेत. पोलिस आयुक्त ए.एस.चावला म्हणाले, दोन्ही पासपोर्ट संबंधीत कार्यालयात पाठवण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सिरसा येथील डेरा मुख्यालयात इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (अमंलबजावणी संचालनालय) आणि आयकर विभागाची टीम चौकशी करणार आहे. 
 
बाबाच्या कंपनीच्या CEO ला अटक 
- हरियाणा एसआयटीने राम रहिमची कंपनी MSGचा CEO आणि चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक केली आहे.  
- पंचकुलामध्ये भडकवण्यात आलेल्या दंगलीत अरोराचा महत्त्वाचा वाटा होता असा आरोप आहे.
- पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार, सोमवारी रोहतकवरुन आयकर विभागाची टीक सिरसाला दाखल झाली. 
- एडीआय (असिस्टंट डायरेक्टर इन्व्हेस्टिगेशन) यांच्या नेतृत्वातील पथकाने सर्वात पहिले शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली की, ईडी आणि आयटी विभाग सिरसा डेऱ्यात छापा टाकणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...