आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana's Big Political Leaders Fate Close In Voting Machine

हरियाणात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; मुख्यमंत्री हुडा, बिष्णोई पती-पत्नी भविष्य आजमावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - महाराष्ट्रानंतर देशाचे लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार आहे. यात अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ९० सदस्यीय विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १ हजार ३५१ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. यात १०९ महिला उमेदवार आहेत.

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार सुरू होता. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रचार थंडावला. त्यानंतर काही पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजीचा फंडा वापरून शेवटचे आवाहन केले. राज्यातील मुख्य लढत ही काँग्रेस आणि इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) यांच्यात होणार आहे. नवीन चेहरे हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. काँग्रेस आणि आयएनएलडी यांच्या व्यतिरिक्त भाजप पहिल्यांदाच राज्यात सरकार स्थापनेसाठी जोर लावत आहे. स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न भाजपने केला आहे. १९६६ नंतर पहिल्यांदाच भाजपने अशा प्रकारचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. मोदी फॅक्टर राज्यातही प्रभावी ठरेल, असा भाजपचा होरा आहे.

महत्त्वाचे उमेदवार
मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, रणदीप सुरजेवाला (काँग्रेस), ओमप्रकाश चौटाला यांचे पुत्र अभय, स्नुषा नैना, नातू दुष्यंत (आयएनएलडी), माजी मंत्री विनोद शर्मा त्यांची पत्नी शक्ती राणी, माजी खासदार कुलदीप बिष्णोई, त्यांची पत्नी रेणुका, त्यांचे थोरले बंधू व माजी उपमुख्यमंत्री चंदरमोहन.

लाल घराण्यांची सद्दी संपणार?
हरियाणात देवीलाल, बन्सीलाल, भजनलाल ही राजकारणातील लोकप्रिय घराणी मानली जातात. यंदाच्या निवडणुकीत लाल घराण्यांचे नातेवाईक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी निवडून येणे अटीतटीचे बनले आहे. निवडणुकीत यश मिळाल्यानंतरच लाल घराण्यांची परंपरा जपली जाईल.

१.६३ लाख मतदार बजावणार हक्क
८७.३७ लाख महिला मतदार