आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणवी सिंगर - डान्सर हर्षिताचा खून, गाडी रोखून 4 गोळ्या झाडल्या, मिळाली होती खुनाची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - हरियाणाची फोक सिंगर आणि डान्सर हर्षिता दाहिया (20) हिचा मंगळवारी तिच्याच कारमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. घटनेच्या वेळी हर्षितासोबत तिचे काही मित्रही होते. त्यांना हल्लेखोरांनी गाडीतून उतरवले होते. हर्षिताला 4 गोळ्या लागल्या. तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत्यूच्या काही तास आधीच हर्षिताने  धमकी मिळाल्याचे फेसबुकवर म्हटले होते.
 
सोनिपतची राहणारी होती हर्षिता
- हर्षिता दहिया सोनिपतच्या मोहम्मदपूर गावातील रहिवासी होती. सध्या ती तिच्या मावशीसोबत दिल्लीत राहत होती. हर्षिताच्या आईवडिलांचे निधन पूर्वीच झालेले आहे. हर्षिता दोन बहिणी आहेत, त्यांची लग्ने झालेली आहेत.
- मागच्या दीड वर्षात डान्स आणि गायिका म्हणून हर्षिता प्रसिद्ध झाली होती. फेसबुक पेजवर ती आपले व्हिडिओही अपलोड करायची. मृत्यूआधीही धमकी मिळाल्याचे तिने फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटले होते.

हल्लेखोरांनी हर्षिताची कार ओव्हरटेक केली होती
- मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता हर्षिता एका कार्यक्रमावरून परतत होती. तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तिच्यासोबत संदीप आणि निशा हे मित्रही होते.
- सोनिपतच्या रस्त्यात एका कारने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले आणि मग हर्षिताची गाडी अडवली. कारमधून दोन जण बाहेर आले. त्यांनी हर्षिताच्या मित्रांना पळून जायला सांगितले. यानंतर जवळून हर्षितावर 4 गोळ्या झाडल्या.
- प्रकरणाची माहिती मिळताच एसपी राहुल शर्मा, डीएसपी क्राइम देशराज आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. सध्या, हत्येचे कारण समोर आलेले नाही. हर्षिताने फेसबुक व्हिडिओत म्हटले होते की, मी धमक्यांना भीक घालत नाही. परंतु तिचा खून करण्यात आला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...