आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hate Speech: UP Govt To Appeal Against Varun Gandhi's Acquittal

प्रक्षोभक भाषण, वरूण गांधींविरुद्ध याचिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात भाजपचे खासदार वरूण गांधी यांच्या विरूद्ध उत्तर प्रदेश पोलिस अपील करणार आहे.

पिलीभीत जिल्हा न्यायालयाने वरूण यांची पुराव्या अभावी सुटका केली होती. एसटीएफ पोलिस महासंचालक आशीष गुप्ता म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले जाईल. त्यासाठी पोलिसांकडे 25 मे आणि तीन जूनपर्यंतचा कालावधी आहे.

2009 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सभेत वरूण यांनी चिथावणीखोर भाषण केले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, राज्यातील समाजवादी पार्टीचे सरकार वरूण गांधी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. सरकारी दबावामुळे त्यांच्या विरूद्ध साक्षीदार उलटले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.