आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतापसिंहांच्या कवी मनातून साकारला होता हवामहाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरिष्ठ पत्रकार प्रकाश भंडारी सांगताहेत जयपूरची ओळख झालेल्या हवामहालाच्या निर्मितीची कहाणी
सवाई प्रतापसिंह(१७५० -१७६७) हे माधोसिंह दुसरे यांचे सुपुत्र होते. आपला १५ वर्षांचा सावत्र भाऊ पृथ्वीसिंहच्या मृत्यूनंतर ते जेव्हा गादीवर बसले तेव्हा ते फक्त १४ वर्षांचे होते. लहान वयात मोठी जबाबदारी पेलताना त्यांनी प्रशासनात अनेक बदल केले. वडील अडीच मण वजनाचे होते, पण प्रतापसिंह यांनी आपला बांधा सडसडीत ठेवण्यासाठी घोडेस्वारी, तलवारबाजी, कुस्ती, चौगान (पोलो) आणि कसरतीची मदत घेतली.

कला आणि साहित्यात प्रतापसिंह यांची रुची होती आणि ते कवी म्हणून ओळखले गेले. त्यांचे टोपणनाव होते वज्रनिधी. हा तो काळ होता जेव्हा कवी आणि साहित्यिकांना राजकीय संरक्षण मिळू लागले होते. आनंदघन, देवकवी गणपत भारती, नाथकवी जगदीश भट्ट, शिवदास, कवी कलानिधी, साहिबराम, जीवन मंगल, रामसेवक गोविंदा, पद्माकर आणि रासा रासी रामनारायण यांच्यासारखे कवी साहित्यिक प्रतापसिंहांच्या समकालीन होते.

गुमानीरामला अकबराच्या जीवनावर आधारित आयने-ए-अकबरीचा अरबीतून डिंगल भाषेत अनुवाद करण्याची जबाबदारी दिली गेली. ठाकूर प्रल्हादसिंह यांनी सवाई प्रतापसिंहांवर फार काही वाचले आणि लिहिले आहे. ठाकूर प्रल्हादसिंह सवाई प्रतापसिंह यांच्या दिनचर्येवर इंग्रजीत लिहीत असत : पहाटे तयार होऊन जेव्हा ते गोविंददेवजी यांच्या दर्शनासाठी जात होते, त्यांच्यासह ठाकूर, ताजिमी सरदार, पंडित, कवी आणि संगीतज्ञ होते. ते घोड्यांचे हौशी होते आणि आतिश येथे जाऊन घोडे संाभाळत होते. घोडेस्वारी आणि चौगान(पोलो) नंतर दुपारी जेवण्यापूर्वी ते सुस्तावत आणि पुन्हा उठून भोजन करत आणि पान खात. यानंतर दुपारी तीन ते सहा वाजता दरबार भरत असे आणि त्यानंतर सायंकाळ संगीत ऐकण्यात जात असे.

चित्ता पाळणे, घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजीची त्यांना फार हौस होती. तिरंदाजीत ते निपुण होते. महाराजा जयसिंह यांच्यानंतर स्थापत्यकलेला विकसित करणारे कोणी शासक जर असतील तर ते महाराजा प्रतापसिंहच होते. त्यांनीच जयपूरमध्ये हवामहाल तयार केला.

असा अनोखा हवामहाल ज्याला ३६५ हवेच्या खिडक्या होत्या. माती, चुना, दगडात बनलेला हा सौंदर्यशाली हवामहाल असा होता की जणू एखाद्या देवतेचा मुकुट. बडी चौपडमध्ये सिरह ड्योढी बाजारात उभा असलेला हवामहाल वीरेंद्र पोलच्या जवळ आहे. जिथून जलेबी चौकात प्रवेश करतात. हवामहाल आज जगातील एक असे वेगळेच, अद्भुत इमारतीचे उदाहरण आहे की तिथे बसूनच महाराजा प्रतापसिंह कविता लिहीत असत. आज त्याच हवामहालासमोर पर्यटक आपला फोटो काढून घेणे विसरत नाहीत. हवामहाल जयपूरची ओळखच झाला आहे.

राण्यांनी तक्रार केली तेव्हा प्रतापसिंहांना सूचली कल्पनेपलीकडील हवामहालाची कल्पना
ठाकूर प्रल्हादसिंहांची एक रंजक कहाणी आहे, जी त्यांनी दि हवामहाल : इन्क्रेडिबल पॅलेस ऑफ विंड्स यात लिहिली आहे. एक दिवस प्रतापसिंह, राणीवशातून त्यांच्या १२ महाराण्या, सहा पासवान आणि एका नर्तकीच्या प्रतीक्षेत न्याहारीसाठी बसले होते. किन्नरांना त्यांना आणण्यासाठी अनेकदा पाठवले गेले, पण त्या आल्याच नाहीत आणि कुठलेही कारणही सांगितले नाही. नाराज होऊन हिजड्यांमार्फत प्रतापसिंहांनी हा सांगावा पाठवला की, जर त्या (महाराण्या) आल्या नाहीत तर ते राजमहाल सोडून अज्ञातवासात निघून जातील. हे ऐकून घाबरलेल्या सर्व स्त्रिया आल्या. नाराज महाराजांनी उशिरा येण्याचे कारण विचारताच त्या एकसुरात म्हणाल्या की, राजवाड्यात तर तसेही सर्व सुखसुविधांचे साहित्य आहे. पण आपल्या दरवाजे-खिडक्यांमधून त्या शहर आणि तीज सण पाहू इच्छित होत्या. महाराजांनी लक्षपूर्वक सर्व स्त्रियांची व्यथा-कथा ऐकली आणि सांगितले की, ते त्यांच्यासाठी एक असा महाल बनवतील की ज्याची कल्पनादेखील त्या करू शकणार नाहीत. प्रतापसिंहांनी वास्तुस्थापत्य लालचंद्र उस्ता यांना बोलावले आणि सांगितले की, त्यांनी त्यांच्यासाठी एक असा महाल बनवावा की ज्याची कल्पनादेखील त्या सर्व (स्त्रिया) करूच शकणार नाहीत. महालाच्या ठिकाणाची निवड अशी असावी की जी चंद्रमहालाच्या जवळ असावी. महाल असा असावा की ज्यातून राणी बाहेर पाहू शकेल; पण बाहेरून मात्र आतली कोणतीही गोष्ट दिसू नये. हवापाण्याची व्यवस्था असावी आणि महाल त्यांच्या कविकल्पनेतील असावा आणि मग जे तयार झाले तो होता हवामहाल.
बातम्या आणखी आहेत...