आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपूरमध्ये अडकलेली हवादेवी मायदेशी रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- गंगेत पवित्र स्नानासाठी दीड वर्षापूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या बुजुर्ग महिला हवादेवी शुक्रवारी पाकिस्तानला रवाना झाल्या. गृह खात्याने दोन दिवसांत त्यांना घरी पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि सोबत एक कर्मचारीदेखील जोधपूरपर्यंत त्यांना सोडण्यासाठी आला होता.

तत्काळ भारत सोडा, अशी आदेशाची भाषा असली तरी विवाहानंतर माहेर सोडून सासरी जाण्यासारखीच हवादेवींची मनोवस्था होती. ८० वर्षांच्या हवादेवी २१ महिन्यांनंतर पती आणि नातवांच्या भेटीसाठी उत्सुक होत्या. त्या मुलगा महेश, इतर नातेवाईक आणि १५ जणांसह २९ मार्च २०१४ रोजी भारतात दाखल झाल्या होत्या. गंगास्नान केले आणि जोधपूरमध्ये माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी आल्या. सोबतच्या १२ लोकांना भारतातच राहण्याची इच्छा होती; परंतु हवादेवीचे कुटुंब मायदेशी परतू इच्छित होते.

तत्काळ देश सोडा
दोन महिन्यांपूर्वी हवादेवी यांची व्यथा ‘भास्कर’ने प्रकाशित केली होती. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून मदतीचे आश्वासन दिले. त्यांची इच्छा जाणून स्वराज यांनी तत्काळ मायदेशी पाठवण्याचे आदेश दिले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झटपट पूर्ण केली.
बातम्या आणखी आहेत...