आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारीबागच्या जिल्हाधिकार्‍यांनी NTPCच्या उपव्यवस्थापकांना बनवले \'मुर्गा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/हजारीबाग- भारत सरकारची कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे (एनटीपीसी) उपमहाव्यवस्थापक (डीजीएम) राकेश नंदन सहाय यांनी हजारीबागचे जिल्हाधिकारी (डीसी) सुनील कुमार यांच्यावर मुर्गा बनवल्याचा तसेच मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

जिल्हाधिकारी सुनील कुमार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता आपल्या निवासस्थानी बोलावले. 'मुर्गा' बनण्यास सांगितले. त्याला विरोध केल्यास आठ सुरक्षारक्षकांना बोलवून त्यांना आपल्याला मारहाण करण्याचे आदेश दिले. आपल्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याचे राकेश नंदन सहाय यांनी तक्रारीत म्हटले आहे.

जिल्हाधिकारी सुनील कुमार यांनी मात्र, राकेश सहाय यांचा मारहाणीचा आरोप फेटाळला आहे. सहाय यांनी गैरवर्तवणूक केल्यामुळे त्यांना समज दिल्याचे स्पष्टीकरण सुनील कुमार यांनी दिले आहे.
दरम्यान, डीजीएम सहाय यांना सदर रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर सहाय यांना पुढील उपचारासाठी रांची येथे पाठवण्यात आले आहे. डीजीएम सहाय यांच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे.

उपव्यवस्थापक सहाय म्हणाले की, जिल्हाधिकारी सुनील कुमार यांनी सोमवारी बोलावले होते. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे कुमार यांची भेट घेता आली नाही. सुनील कुमार यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी बोलावले. मायनिंग मॅनेजर श्रीकांत सिन्हा आणि सहाय्यक नीरज यांच्यासोबत मी पोहोचलो. यावेळी सुनील कुमार यांनी श्रीकांत सिन्हा यांना बाहेर जाण्यास सांगितले. नंतर त्यांनी मला 'मुर्गा' बनण्यास सांगितले. मात्र मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी आठ सुरक्षा रक्षकांना बोलावून अॅल्युमिनियमच्या रॉडने मला मारहाण करण्याचे आदेश दिले. या मारहाणीत उजव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी एनटीपीसीचे कार्यकारी व्यवस्थापक रवींद्रसिंह राठी यांनी बोलणे टाळले आहे. सदर रूग्णालयात डीजीएम यांना पाहाण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत एजीएम महापात्रा यांच्यासह एनटीपीसीचे अन्य अधिकारी होते.
दुसरीकडे, जिल्हाधिकारी सुनील कुमार यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. डीजीएम सहाय यांनी माझ्या निवासस्थानी गैरवर्तवणूक केली होती. अभद्र भाषेत शिविगाळ करून अपमानीत केले. एवढेच नव्हे तर बड्या अधिकार्‍यांचा धाक दाखवून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यावर सुरक्षा रक्षकांना बोलावले तर डीजीएम सहाय यांना मांडीवरील जुनी जखमेवर ओरबडले आणि मारहाण केल्याचा खोटा आरोप केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डीजीएम आणि हजारीबाग डीसी यांचे छायाचित्रे....