आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Allows Jail Inmates To Have Sex With Their Partners

तुरुंगात पती, पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवणे हा कैद्याचा मुलभूत अधिकार : हायकोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड : पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कैद्यांना अपत्य जन्माला घालण्यासाठी तुरुंगात पती अथवा पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची सूट असल्याचे या निर्णयात म्हटले आहे. पती अथवा पत्नीबरोबर तुरुंगात शरीरसंबंध ठेवणे हा कैद्याचा मुलभूत अधिकार असल्याचेही कोर्टाने मान्य केले आहे.

जस्टीस सूर्यकांत यांनी पटियालाच्या सेंट्रल जेलमध्ये कैदेत असलेल्या जसवीर सिंह आणि सोनिया नावाच्या कैद्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. दोघांवर 16 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याचा आरोप आहे. या दोघांनी तुरुंगात शरीरसंबंध ठेवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कोर्टाने या दोघांच्या अपराधाचे गांभीर्य पाहता त्यांची मागणी फेटाळली आहे.

या कैद्यांची मागणी फेटीळली गेली असली तरी, न्यायाधीशांनी व्यापक जनहिताचा विचार करून तुरुंगात शरीरसंबंधाचा अधिकार ग्राह्य ठरवला आहे. कोर्ट म्हणाले की, सध्या समलैंगिकांचे अधिकार आणि थर्ड जेंडरच्या ओळखीसाठी झगडणारा समाज कैद्याच्या शरीरसंबंधाच्या मुद्यावर शांत राहू शकत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. घटनेच्या कलम 21 चा हवाला देत कोर्टाने स्पष्ट केले आहे की, कैद्याला शरीरसंबंधाची परवानगी देणे हे त्यांच्या जीवन जगण्याचा अधिकार आणि वैयक्तीक स्वातंत्र्या अंतर्गत येते.
असा निर्णय देत असतानाच कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की, अशा अधिकारांची कायद्याच्या चौकटीत राहून अंमलबजावणी व्हायला हवी. ते ठरवण्याचा अधिकारही सरकारकडे आहे. यासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात जेल रिफॉर्म कमिटी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. कमिटी कैद्यांच्या कुटुंबीयांना शरीरसंबंधांसाठी कशा प्रकारे तुरुंगात आणता येईल याचा विचार करणार आहे.