आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर ट्रॅजडी: UP सरकारने मुलांच्या मृत्यूचे खरे कारण सांगावे - अलाहाबाद HC

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशमध्ये 30 बालकांसह 60 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून या घटनेबद्दल रोष व्यक्त होऊ लागला होता. - Divya Marathi
उत्तर प्रदेशमध्ये 30 बालकांसह 60 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून या घटनेबद्दल रोष व्यक्त होऊ लागला होता.
अलाहाबाद (उत्तरप्रदेश) - गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 30 मुलांसह 60 जणांच्या मृत्यू प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने योगी सरकारला उत्तर मागितले आहे. मुलांच्या मृत्यूचे खरे कारण काय होते, असा सवाल कोर्टाने यूपी सरकारला केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. 
 
सत्य समोर आले पाहिजे - हायकोर्ट 
- अलाहाबाद हायकोर्टाने बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या मृत्यू तांडवाची घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. जेणे करुन भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी आपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. 
- मुख्य न्यायाधीस डी.बी. भोसले आणि जस्टिस यशवंत वर्मा म्हणाले, 'कोर्टाच्या आदेशाआधी मृत्यूचे कारण काय होते हे उत्तर प्रदेश सरकारने सांगणे गरजेचे आहे.'
- 60 हून अधिक रुग्णांच्या मृत्यूचे कारण देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने वेळ मागितला. पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. 
 
सरकार सारवासारव करत आहे- याचिकाकर्त्यांचे वकील
- मुलांच्या मृत्यू प्रकरणी हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 
- याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटले, 'एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुलांचे शवविच्छेदन केले गेले नाही.एवढेच नाही तर एफआयआर देखील दाखल केला नाही. याप्रकरणी सरकार खोटी माहिती देत असल्याचा आरोप आहे. सरकारने फक्त सारवासारव केली.'
 
सरकार काही तरी लपवत आहे - नुतन ठाकूर 
- आणखी एक याचिका दाखल झाली आहे. आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नूतन ठाकूर यांच्या याचिकेवर कोर्टाने सुनावणी केली. 
- जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस द्या शंकर तिवारी यांच्या पीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना उत्तर देण्यासाठी 6 आठवड्यांचा वेळ दिला आहे. 
- या प्रकरणात सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल राघवेंद्र प्रतापसिंह आणि वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या वतीने संजय भसीन उपस्थित होते. 
- सिंह म्हणाले, सरकार योग्य पाऊले उचलत आहे. मुख्य सचिवांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. 
- डॉ. नूतन ठाकूर म्हणाल्या, राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या तपासावरुन असे वाटते की सरकार काही तरी लपवत आहे. काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरुन असे वाटते की मुख्य सचिवांचा अहवाल हा फक्त फार्स ठरणार आहे. 
 
काय आहे गोरखपूर ट्रॅजडी 
- बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमध्ये 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान 30 लहान मुलांसह 60 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप होत आहे. 
- पुष्पा सेल्स कंपनीचे 86 लाख रुपये बिल थकल्यामुळे त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. 
- कंपनीचे म्हणणे होते की आम्ही 14 स्मरण पत्र पाठवले मात्र त्यानंतरही प्राचार्य राजीव मिश्रा यांनी दखल दिली नाही. 
-  30 बालकांसह 60 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून या घटनेबद्दल रोष व्यक्त होऊ लागला होता. त्यानंतर योगी सरकारने तडकाफडकी प्राचार्य मिश्रा यांना निलंबित केले.  
बातम्या आणखी आहेत...