आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Issues Notice To Azam, Stays Suspension Of Muzaffarnagar Cop

मुझफ्फरनगर दंगल प्रकरणी उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - मुझफ्फरनगर दंगली प्रकरणी अलाहाबा हायकोर्टाने उत्तरप्रदेशचे ज्येष्ठ मंत्री आझम खान यांना नोटीस बजावली आहे. तसेच कोर्टाने दंगली प्रकरणी पाच पोलिस अधिका-यांच्या निलंबनाला स्थिगिती दिली आहे. कोर्टाने आझम खान यांना नोटीशीचे उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. हायकोर्टाने राज्य सरकारलाही नोटीस बजावली असून दोन आठवड्यात उत्तर दे्ण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मुझफ्फरनगर दंगल प्रकरणी पाच पोलिस कर्मचा-यांना निलंबीत केले होते. पोलिसांचा आरोप आहे की, राज्याचे मंत्री आझम खान यांच्या इशा-यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.