आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Slammed Sensor Board To Clearing Kya Kool Hain Hum 3

'क्या सुपर कूल है हम 3' कसा प्रदर्शित होऊ दिला, हायकोर्टाने सेंसॉर बोर्डाला सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील अश्विनी बहल आणि वकिलांबरोबर जान्हवी बहल. - Divya Marathi
वडील अश्विनी बहल आणि वकिलांबरोबर जान्हवी बहल.
चंदिगड - 'क्या सुपर कूल है हम-3' बाबत बुधवारी पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाने सेंसॉर बोर्डाला बुधवारी चांगलेच सुनावले. कोर्टाने म्हटले आहे की, जर सेंसॉर बोर्डाचे सदस्य स्वतः कुटुंबाबरोबर अशा प्रकारचे चित्रपट पाहू शकत नसतील तर इतरांसाठी चित्रपट का रिलीज केला? या अॅडल्ट फिल्म विरोधात लुधियानाच्या एका 15 वर्षीय मुलीने हायकोर्टात याचिका केली होती. गुरुवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. हा चित्रपट 22 जानेवारीला रिलीज झाला आहे.

कोणी दिली परवानगी, कोर्टाची विचारणा...
- 10 वीच्या वर्गात शिकणार्या लुधियाणाच्या जान्हवी बहल नावाच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिचे वय कमी असल्यामुळे तिने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने ही याचिका दाखल केली आहे.
- बुधवारी हायकोर्टात सुनावणीदरम्यान कोर्टाने सेंसॉर बोर्डाला चांगलेच सुनावले. जर सेंसॉर बोर्डाचे सदस्य स्वतः कुटुंबाबरोबर चित्रपट पाहू शकत नसतील तर इतरांसाठी चित्रपट का रिलीज केला अशी विचारणा करण्यात आली.
- हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देणारे नेमके कोण आहेत, अशी विचारणा कोर्टाने सेंसॉर बोर्डाकडे केली आहे.

सेंसॉर बोर्डाचा युक्तीवाद...
- सेंसर बोर्डाने बुधवारी कोर्टात सांगितले की, निर्मात्याने या चित्रपटातील 107 सीन कट केले होते. त्यानंतर आम्ही आणखी 32 सीन कट केले. त्यानंतरच चित्रपटाचा 'ए' सर्टिफिकेट देण्यात आले.
- या चित्रपटात तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 'क्या कूल है हम' आणि 'क्या सुपर कूल हैं हम'चा सिक्वल आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपट पाहण्यासाठी जाणारी शाळेतील मुले...