आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने ब्लू व्हेलवर बंदीचा मार्ग शोधावा- हायकोर्ट, देशात 7 दिवसांत चौथा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन गेमची अॅडमिन असलेल्या १७ वर्षीय मुलीस रशियात अटक करण्यात आली आहे. - Divya Marathi
ऑनलाइन गेमची अॅडमिन असलेल्या १७ वर्षीय मुलीस रशियात अटक करण्यात आली आहे.
मदुराई - जीवघेणा खेळ ब्ल्यू व्हेलवर कडक निर्बंध कसे लादता येतील याचा मार्ग सरकारने शोधावा, असे कडक आदेश सोमवारी मद्रास हायकोर्टाने दिले आहे. हायकोर्टाने यासंबंधी राज्य आणि केंद्र सरकारला सूचना केली आहे. गेल्या एक आठवड्यात या खेळाने साधारण चार जणांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन गेमची अॅडमिन 17 वर्षीय मुलीस रशियात अटक करण्यात आली आहे. 
 
कोणाला बजावली नोटीस 
- मद्रास हायकोर्टाने या प्रकरणात सुओ मोटो दाखल करुन घेत सुनावणी केली. सोमवारी या प्रकरणी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचचे जस्टिस के.के. श्रीधरन आणि जस्टिस जी.आर. स्वामीनाथन यांनी सुनावणी केली. 
- पीठाने याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव आणि गृह सचिवांना नोटीस जारी केली आहे. पीठाने या प्रकरणी काही सुचना केल्या आहेत. 
 
अॅडमिनला रशियात अटक 
ब्ल्यू व्हेल या जगात खळबळ उडवून दिलेल्या ऑनलाइन गेमची अॅडमिन असलेल्या १७ वर्षीय मुलीस रशियात अटक करण्यात आली आहे. गेम खेळणाऱ्या मुलांना हीच धमक्या देत होती. ब्ल्यू व्हेलचे टास्क पूर्ण केले नाही तर त्याला आणि कुटुंबीयांना ठार केले जाईल, अशी धमकी या गेमच्या माध्यमातून देण्याचे तंत्र याच मुलीकडे होते. ही मुलगी मानसोपचारशास्त्राची विद्यार्थिनी आहे. तिने गुन्हाही कबूल केला आहे.

न्यायालयात हजर केल्यानंतर ितला तुरुंगात पाठवण्यात आले. फिलीप बुडेकिन याने 2013 मध्ये हा गेम तयार केला होता. या गेममुळे रशियात आत्महत्या वाढल्यानंतर त्याला अटक झाली. तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, पद्दुचेरीतील केंद्रीय विद्यापीठाचा एमबीएतील विद्यार्थी शशिकुमार बोरा (23) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...