आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्‍ये पोटच्या मुलीलाच त्याने जुगारात गमावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदा (प. बंगाल) - मालदा जिल्ह्याच्या कृष्णपूर-बुरीताला गावात एका जुगारी बापाने सर्व पैसा गमावल्यानंतर पोटच्या 13 वर्षांच्या मुलीवरच डाव खेळला. हा डावही हरल्यानंतर शेजार्‍यासोबत तिचा साखरपुडा उरकून टाकला.
निर्दयी बापाने आपल्या शेजार्‍यासोबत 1 डिसेंबरला जुगाराचा डाव लावला. यात बापाने पैसा-अडका गमावल्यानंतर आता जुगारावर लावण्यासारखे त्याच्याकडे काहीच राहिले नाही. शेवटी त्याने पोटच्या मुलीवरच डाव लावला. मुलगी गमावल्यावर दोन्ही जुगार्‍यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाची तयारी केली. 22 जानेवारीला लग्नाचा मुहूर्त काढून 9 डिसेंबरला साखरपुडाही उरकण्यात आला. ही माहिती कळताच बीडीओ अर्नब रॉय यांनी अधिकार्‍यांना पाठवून कारवाई केली.