आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Termed Modi\'s Functioning Undemocratic And Called Amit Shah Arrogant Ne

पंतप्रधानांना हुकुमशहा तर शहांना अहंकारी संबोधणार्‍या भाजप नेत्याचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाच्या आयटी सेलचे माजी संयोजक प्रद्युत बोरा यांनी राजीनामा दिला आहे. प्रद्दुत बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजपला घराचा आहेर दिला आहे.
नरेंद्र मोदी हुकुमशहा असून त्यांच्या वागणुकीमुळे भाजपच्या 'लोकशाही' परंपरेला ठेच पोहोचवली आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे 'अहंकारी' आहेत. त्यांची काम करण्‍याची पद्धत स्वयंकेंद्रीत असल्याचे प्रद्दुत बोरा यांनी आरोप केले आहेत.

दुसरीकडे, आसामचे प्रदेश भाजपाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी बोरा यांचे सगळे आरोप तथ्यहिन असल्याचे म्हटले आहे. बोरा कधीच लोकांच्या संपर्कात नसतात. त्यामुळे त्यांनी पक्षनेतृत्त्वावर आरोप केले, याचे आश्चर्य वाटत असल्याचे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
परराष्‍ट्र मंत्रालयाच्या सचिवांची उचलबांगडी होत असून त्याची साधी मा‍हिती देखील परराष्ट्र मंत्र्यांना नसते. कॅबिनेट मंत्र्यांना आपले ओएसडी (ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्यूटी) नियुक्त करण्याचेही अधिकार नसतात. पंतप्रधान कार्यलयावर नरेंद्र मोदी यांचीच एक हाती सत्ता आहे. आतापर्यंत पक्षातील ज्येष्‍ठ नेत्यांनी आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांनी यावर सवाल का उपस्थित केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे प्रद्दुत बोरा यांनी म्हटले आहे.
आसामचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य यांच्यावर पलटवार केला आहे. 'बोरा यांनी आपली तक्रार यापूर्वी कधीच जनतेसमोर ठेवली नाही. भट्टाचार्य म्हणाले की, 'फेसबुक', 'टि्वटर', 'एसएमएस' आणि जाहिरातीतून दिलेल्या तक्रारीला काहीच अर्थ नसतो. जोपर्यंत आपण बैठकीत आपले म्हणणे मांडत नाही. तर बोरांना असा अनुभव आला असता तर त्यांच्या आरोपात तथ्य असते. बोरा यांचे आरोप खरे असते, तर राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला नसता. भाजपने 74 पैकी 39 महापालिका निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे.

दरम्यान, प्रद्दुत बोरा यांची 2007-2009मध्ये भाजपच्या आयटी सेलच्या संयोजकपदी निवड झाली होती. तसेच 2011 मध्ये बोरा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.