आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकांनी शाळेत येण्यासाठी मागितले हेलिकॉप्टर; शिक्षण अधिकार्‍याला लिहिले पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सेरसुंधवा या सरकारी शाळेच्या मुख्यध्यापकांनी पाठवलेले अधिकृत पत्र सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यध्यापकाने जिल्ह्याच्या मुख्य शिक्षण अधिकार्‍याला (इओ) पत्र लिहून शाळेतील स्टाफसाठी दोन हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. जेणे करून शाळेत येण्यासाठी स्टाफला कोणतीही अडचण येणार नाही. इओ अशोक कुमार यांनी या पत्रासंबंधीत तपासाचे आदेश दिले आहेत आणि मुख्यध्यापकांकडून याचे सविस्तर उत्तर मागितले आहे.
इओला लिहिलेल्या या पत्रातील मजकूर असा आहे की, शाळा एकदम दूरवर अडगळीच्या ठिकाणी आहे. यामुळे त्याठिकाणी जाण्यास कोणतेही वाहन तसेच संपर्काचे साधन नाही. त्यामुळे शाळेतील कर्मचारी तसेच स्टाफ वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी आमच्या शाळेला दोन हेलिकॉप्टर देण्यात यावेत. यातील एक हेलिकॉप्टर मुख्यध्यापकासाठी आणि दुसरा स्टाफसाठी असेल.
या संदर्भात मुख्यध्यापकांशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र ते शक्य होऊ शकले नाही. परंतु इओने अशा प्रकारचे कोणतेच पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी मुख्यध्यापकांशी संपर्क साधला असून त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र लिहिले नसल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेचे लेटरहेड तसेच शिक्का कोणीतरी चोरून हा प्रकार केल्याचे मुख्यध्यापकांचे म्हणणे आहे. तर इओने याप्रकरणी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल पुर्ण झाल्यावरच या बद्दल स्पष्ट काय ते सांगता येईल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, मुख्यध्यापकांनी इओला लिहिलेल्या संपूर्ण पत्राचा फोटो ...