आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूर : गाय चोरीच्या आरोपात मदरशाच्या मुख्याध्यापकाचा खून, गावात तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ (मणिपूर) - मणिपूरची राजधानी इम्फाळपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात गाय चोरीच्या आरोपावरुन एका मदरशाच्या मुख्याध्यापकाचा खून करण्यात आला आहे. शेजराच्या गावातील लोकांनी मुख्याध्यापक मोहम्मद हसमद अली उर्फ बाबू यांच्यावर हल्ला केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून, अजून गाय चोरीच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही.

काय आहे प्रकरण
अली किरो मतिंग गावातील एका प्राथमिक मदरशाचे मुख्यध्यापक मोहम्मद हसमद अली यांची रविवारी हत्या झाली. या भागात बहुतेक मणिपूरी मुस्लिम राहातात. मुख्याध्यापक मोहम्मद यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे, की रविवारी रात्रीच्या जेवणानंतर आठ वाजता ते पान खाण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर ओरखडे होते.
गाय चोरताना रंगेहात पकडले होते
मोहम्मद अली यांच्या गावातील लोकांचे म्हणणे आहे की अली यांना गाय चोरताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यामुळे शेजारच्या गावातील लोकांनी त्यांचा खून केला. मात्र पोलिसांनी या आरोपांना दुजोरा दिलेला नाही. हत्येच्या घटनेनंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी गावात पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
मोहम्मद अली हे स्थानिक पांगल समाजाचे होते. हा समाज येथे कित्येक दशकांपासून स्थायिक आहे. या समाजासोबतच गावाच्या आसपास मेतीज आणि कुकी आदिवासी समाजाचे लोक राहातात. मोहम्मद अली यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने इरीबुंग पोलिस स्टेशनवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. खून्यांना तातडीने अटक करण्याची त्यांची मागणी आहे.