आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health: In First Time Google Glass Used For Operation In India

आरोग्य: भारतात पहिल्यांदाच गुगल ग्लासचा वापर शस्त्रक्रियेसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - देशात पहिल्यांदाच गुगल ग्लास (चष्मा) लावून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही कामगिरी चेन्नई येथील डॉक्टर जी. एस. राजकुमार यांनी केली. त्याचा मोठा फायदा म्हणजे ओटीमध्ये चाललेली शस्त्रक्रिया दूर बाहेर लाइव्ह बघता येऊ शकते. डॉ. राजकुमार यांनी मंगळवारी गुगल ग्लास लावून शस्त्रक्रिया केली तेव्हा दूर वर्ग खोलीत बसलेले विद्यार्थी लाइव्ह स्ट्रिमिंग बघत होते. अशी लाइव्ह शस्त्रक्रिया जगात केवळ तीन वेळा झाली. या वर्षी जूनमध्ये अमेरिकेचे डॉक्टर राफेल ग्रॉसमॅन यांनी पहिल्यांदा गुगल ग्लासच्या मदतीने शस्त्रक्रिया केली होती.


गुगल ग्लास : जाणून घ्या सर्वकाही
दोन शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण
डॉ. राजकुमार यांनी एका दिवसात ग्लासने दोन शस्त्रक्रिया लाइव्ह स्ट्रिमिंग केल्या. पहिली गॅस्ट्रो इंटेस्टाइनल लेप्रोस्कॉपीची शस्त्रक्रिया. दुसरी हार्नियाची. दोन शस्त्रक्रियादरम्यान ते विद्यार्थ्यांना माहिती देत होते. गुगल हँगआऊटने त्याला लाइव्ह दाखवण्यात आले.


मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी
गुगल ग्लास वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर साधन ठरू शकते. विद्यार्थी याच्या मदतीने वरिष्ठ डॉक्टरांकडून खूप काही शिकू शकतात.’’
डॉ. जी. एस. राजकुमार


डोळ्यांवर स्क्रीन
गुगलचा ग्लास परिधान करण्यासारखे संगणक आहे. त्याला चष्म्यासारखे घालता येऊ शकते. त्यात लेन्स नसतात. उजव्या डोळ्यावर छोटी स्क्रीन असते. व्हाइस कमांडने ती नियंत्रित केली जाते. यामुळे फोटो, व्हिडिओ तयार करून लाइव्ह स्ट्रिमिंग करता येते.


वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी
० विद्यार्थ्यांना शिकवणे व रेकॉर्डिंगसाठी उपयोगी येऊ शकते. त्यातून मदतदेखील मागवता येऊ शकते.
० शस्त्रक्रियेदरम्यान एक्स-रे, एमआरआय इमेज, संदर्भ सामग्री तयार करता येऊ शकते.
० माहितीपटासाठी सर्वाधिक उपयुक्त. रुग्णांची आरोग्यविषयक माहितीदेखील ठेवता येऊ शकते.
० वैद्यकीय अ‍ॅपललादेखील सपोर्ट करू शकते.
परंतु काही अडचणीदेखील : डोळ्यासमोरचा पॉप-अप मेनू शस्त्रक्रियेतून लक्ष वळवू शकतो. रुग्णाच्या परवानगीशिवाय छायाचित्रे घेतली जाऊ शकतात.