आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/जोधपूर- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री सध्या कोर्ट-कचे-यांच्या फे-यात अडकले आहेत. संजय दत्तला शिक्षा झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणाकडे वळल्या आहेत. याप्रकरणाची आज जोधपूर येथील न्यायालयात सुनावणी झाली. अभिनेता सलमान खान अनुपस्थित होता. सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम मात्र सुनावणीस हजर होते.
याप्रकरणी न्यायालयाने सलमान खानला वगळता सर्वांवर नव्याने आरोप निश्चित केले आहेत. सलमान खान उपचारासाठी अमेरिकेत असल्यामुळे सुनावणीस हजर नव्हता. त्याबाबत त्याने वकीलांमार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 एप्रिलला होणार आहे. सर्व कलाकारांनी आरोप फेटाळले आहेत. आता न्यायालयात साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात येईल.
सर्व आरोपींना एक एक करुन न्यायालयात बोलाविण्यात आले. त्याच्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप वाचण्यात आले. दोषी आढळल्यास 3 ते 6 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम साथ साथ है'च्या चित्रिकरणादरम्यान 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 च्या रात्रीदरम्यान या सर्वांनी दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. दुष्यंत सिंह नावाच्या स्थानिक व्यक्तीसोबत कांकाणी सीमेवर हा प्रकार घडला होता. शिकारीप्रकरणी न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2006 ला आरोप निश्चित केले होते. परंतु, आता नव्याने आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.