बेंगळुरू - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख जयराम जयललिता यांचा जामनी अर्ज कर्नाटक हायकोर्टाने फेटाळला आहे. भ्रष्टाचारासारख्या प्रकरणांमध्ये जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत कोर्टाने जयललितांचा अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान,या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. तसेच पोलिसांनी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.
जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात कनिष्ट न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले असून, जामीनासाठी अर्जही केला होता. जयललिता यांच्याशिवाय त्यांच्या तीन नीकटवर्तीयांनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दुसरीकडे जयललितांना शिक्षा सुनावल्याने नाराज झालेल्या अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन केले. आमदार ओम शक्ती शेखर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी विरोध करत पद्दुचेरीच्या सारम क्षेत्रात उपोषण केले. तसेच जयललिता यांना तत्काळ सोडण्याची मागणी केली. पक्षाचे सचिव पी.पुरुषोत्तम यांना वगळता इतर आमदारांनी आंदोलकांची भेट घेतली.