आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heart Flown In From Bangalore To Be Transplanted Into Patient At Chennai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका हृदयासाठी थांबली दोन शहरांची धडधड!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू/चेन्नई - प्रत्यारोपणासाठीनेण्यात येणारे हृदय रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी दोन मोठ्या शहरांच्या धावत्या रस्त्यांवरील रहदारी रोखली. हृदयाच्या सुरक्षित प्रवासासाठी "ग्रीन कॉरिडॉर' तयार करत बंगळुरूतील ४२ चेन्नईतील १२ असा एकूण ५४ किलोमीटरचा रस्ता रोखण्यात आला. बंगळुरूत "ब्रेन डेड' झालेल्या ३० वर्षांच्या महिलेचे हृदय चेन्नईत सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी ही सर्व कसरत करण्यात आली. चेन्नईत संध्याकेाळी एका रुग्णावर या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

बंगळुरूतील बीजीएस रुग्णालयाचे प्रवक्ते सतीश मंजूनाथ यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, तामिळनाडूतील उसूरमध्ये एका महिलेच्या डोक्याला इजा झाली. शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली. शेवटी त्यांना बीजीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही मंगळवारी ही महिला "ब्रेन डेड' अवस्थेत गेली. यानंतर एका संस्थेने तिच्या नातेवाइकांना अवयव उर्वरित.पान १२

दानासाठी राजी केले. महिलेचे यकृत, किडनी डोळे कर्नाटकाच्या रुग्णांना दान करण्यात आले. हृदय काढून चेन्नईला पाठवण्यात आले. योगायोगाने बुधवार सकाळीच रुग्णालयाचे डॉ. एन.के. वेंकटरमण्णा यांच्याकडे चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयातून एका रुग्णसाठी हृदयाची गरज असल्याचा फोन आला होता. यानंतर तत्काळ बंगळुरू वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय ते विमानतळ हा ४२ किमीचा रस्ता एकीकडून रिकामा केला. रुग्णवाहिकेतून हृदय विमानतळापर्यंत पोहोचवले. ४२ किमीचा रस्ता ४० मिनिटांत पार झाला. हृदय विमानाने चेन्नईला पाठवण्यात आले. तेथे विमानतळावरून रुग्णालयापर्यंतचे १२ किमीचे अंतर फक्त मिनिटांत कापण्यात आले. या दरम्यान रुग्णवाहिकेने ११ चौक पार केले.
याआधी १७ जून २०१४ रोजी चेन्नईतही असाच प्रयत्न झाला होता. प्रत्यारोपणासाठी नेण्यात येणाऱ्या हृदयासाठी १२ किमीचे अंतर १३ मिनिटांत पूर्ण करण्यात आले होते. वेळेवर हृदय पोहोचल्यामुळे एका तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले होते.
1:45 वा.: बीजीएसमधूनबंगळुरू येथील विमानतळाकडे हृदयाचा प्रवास सुरू
2:30 वा.: हृदय एअरपोर्टवर पोहोचले. येथून विमान ३:२५ वा. चेन्नईकडे रवाना.
4:25 वा.: विमानचेन्नईत दाखल.
4:30 वा.: एअरपोर्टहूनहृदय रुग्णालयाकडे रवाना.
4:37 वा.: फोर्टिसरुग्णालयात हृदय दाखल.
असा होता रूट प्लॅन
दोन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाने वेळेवर हृदय पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांशी चर्चा केली. दुपारी १: ३० वाजता बंगळुरू पोलिसांनी हृदय सुरक्षित पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर आखला.

कोणत्याही विशेष व्यवस्थेविना या रूट प्लॅनवरून जाण्यासाठी सहा तास लागतात.
इतका वेळ लागला असता तर हृदय निकामी झाले असते.
हृदय सुरक्षितरीत्या नेण्यासाठी त्याला विशेष तरल पदार्थाने भरलेल्या डब्यात ठेवले.
तीन तासांचे अंतर ४७ मिनिटांत कापले
बंगळुरू : ४२किमीचे अंतर ४० मिनिटांत कापले, यासाठी सामान्यत: दीड ते दोन तासांचा अवधी लागतो.
चेन्नई: १२किमीचे अंतर मिनिटांत गाठले, गर्दीमुळे लागतो एक तास