आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heaviest Wight Foreign Satelite Launch Today By Isro

सर्वाधिक वजनाच्या परदेशी उपग्रहांचे आज ISRO करणार प्रक्षेपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) शुक्रवारी व्यावसायिक उपग्रहांचे सर्वांत मोठे प्रक्षेपण करणार आहे. शुक्रवारी सकाळी ९.२८ मिनिटांनी इस्रो पीएसएलव्हीच्या मदतीने ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करेल. या उपग्रहांचे वजन १४४० किलो अाहे. यापूर्वी ३० जून २०१४ मध्ये इस्रोने सर्वांत वजनदार असलेल्या फ्रान्सच्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. त्या उपग्रहाचे वजन ७१२ किलो होते.

तीन मोठे, दोन लहान उपग्रह
>ब्रिटनचे तीन आयडेंटिकली ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट आहेत. यांचे वजन ४४७ ते ६४७ किलोपर्यंत आहेत.
>शिवाय २ छोटे उपग्रहही सोडले जातील. यात एक ९ किलो, तर दुसरा ७ किलो वजनाचा असेल. याव्यतिरिक्तही उपग्रह प्रक्षेपित होतील.

१३ अब्ज 'एंट्रिक्स'ची उलाढाल
'एंट्रिक्स' ही इस्रोची व्यावसायिक शाखा असून ती अंतराळ उत्पादने, तंत्रज्ञान, कन्सल्टन्सी सर्व्हिसचे प्रमोशन तसेच व्यवसायीकरणाचे काम करते. २०१२-१४ दरम्यान या शाखेने १३ अब्ज रुपयांची उलाढाल केली आहे. भारत सरकारच्या अधीन असलेल्या या कंपनीची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली होती. यात खासगी क्षेत्रातील भागीदारीही अाहे. परदेशी ग्राहकांना इस्रोच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे ही कंपनी काम करते. पुढील काही वर्षांत ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.
४० परदेशी उपग्रह (१९ देशांचे) आतापर्यंत भारताने लाँच केले.
७९ दशलक्ष डॉलरची (५०० कोटी) कमाई (उपग्रहांच्या लाँचिंगमधून)
१२ लाख कोटी रुपयांची उलाढाल (२०१३ मध्ये उपग्रह लाँचिंग)
१० उपग्रह २८ एप्रिल २००८ रोजी एकदाच लाँच केले होते इस्रोने.
२७ मोहिमा (पीएसएलव्ही) यशस्वी. १ आंशिक यशस्वी, १ अयशस्वी.

प्रक्षेपणाचा खर्च आला निम्म्यावर
५ टन वजनाचे उपग्रह लाँच करण्यासाठी आधी भारताला परदेशी एजन्सीला ५०० कोटी रुपये द्यावे लागायचे. मात्र, जानेवारी २०१४ मध्ये इस्रोने जीसॅट-१४ हे उपग्रह केवळ २२० कोटी रुपये खर्चूनच अंतराळात पाठवले होते.