आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Cold Wave In North India,Traffic Jam In Simla

उत्तर भारत गारठला, सिमल्यात ट्रॅफिक जॅम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऐन हिवाळ्यात पावसासह बर्फवृष्टी झाल्याने महाराष्ट्रातील जनता हवालदिल झाली असताना उत्तर भारतही थंडीने कुडकुडला आहे. हिवाळ्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याने दिल्लीसह इतर राज्यांतील पारा आणखीच खाली घसरला. राजधानीत सर्वदूर पाऊस आणि बर्फाळ वा-यामुळे दिल्लीकरांनी रविवारच्या सुटीची संधी घेत घरातच राहणे पसंत केले, तर हिमाचल प्रदेश, सिमल्यात बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असून सुमारे दहा हजार पर्यटक अडकून पडले आहेत.

दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही परिसरात जोरदार पाऊस झाला. उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये आणखी बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातील शहाजानपूर येथे सर्वात कमी म्हणजेच ३ अंश सेल्सियस एवढे तापमान मोजले गेले. हरियाणात सर्वात कमी तापमान ११.७, तर पंजाबमधील अमृतसरमध्ये किमान तापमान ८.६ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. राजस्थानमधील जैसलमेर येथे पारा ६ अंश सेल्सियसवर घसरला.

श्रीनगरचा पारा शून्या खाली
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेने श्रीनगरमधील पारा तीन अंशांनी खाली घसरला. शहरातील किमान तापमान उणे १.२ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले तर कमाल तापमान ८.९ अंशावर घसरले. काश्मीर खो-यातील काझीगंड येथील तापमान उणे ०.३ अंश एवढे मोजले गेले. शनिवारी रात्री येथील तापमानाचा पारा २.४ वर घसरला होता. हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टीन जनजीवन विस्कळीत झाले आहे.