आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू दुसऱ्या दिवशी गोळीबार, पाकची आगळिक सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - सर्जिकल स्ट्राइकनंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. मंगळवारी पाकिस्तानने आपल्या पोस्टवर गोळीबार केला आहे. असंख्य तोफगोळे टाकण्यात आले. ते ग्रामीण भागात पडले; पण कोणतीही प्राणहानी झाली नाही. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

नौशहरा भागात पाकिस्तानने सकाळी गोळीबार सुरू केला. याआधी साध्या बंदुकांचा वापर करण्यात आला. नंतर तोफांतून गोळे सोडण्यात आले. सर्वाधिक गोळीबार कलसिया सेक्टरमध्ये होत होता. भारताकडूनही या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. गोळे गावात पडले तेव्हा सैन्याच्या मदतीने गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या भागात पाककडून सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार सुरू होता. त्यानंतर दुपारी अखनूरच्या पालावाला सेक्टरमध्ये जबरदस्त फायरिंग सुरू होती. सुरुवातीला दोन ते तीन चौक्यांना पाकने लक्ष्य केले होते. नंतर गावांवरही गोळे फेकण्यात आले. गगरेयाल तथा छन्नी फलतान भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तथापि, या भागात आधीच गावकऱ्यांना हटवण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मूमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे आणि अतिरिक्त तास घेण्याचे अादेश दिले होते.

बीएसएफने अमृतसरमध्ये पकडले पाकिस्तानी जहाज
बीएसएफने पाकिस्तानातून आलेले एक रिकामे जहाज ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील तोता पोस्टजवळ रावी नदीत करण्यात आली. बीएसएफचे महासंचालक आर. एस. कटारिया यांनी सांगितले, सीमेवरील तणाव लक्षात घेता, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकनंतर जहाज सापडण्याची ही दुसरी घटना आहे. कोस्ट गार्ड ने ३ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर ९ लोकांसह पाकचे जहाज पकडले होते.
बातम्या आणखी आहेत...