आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगड-सिमला राष्ट्रीय महामार्गावर डोंगरचा कडा कोसळला; 6 गाड्या ढिगाऱ्याखाली; वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंगराचा जवळपास 200 फूट भाग कोसळला आहे. - Divya Marathi
डोंगराचा जवळपास 200 फूट भाग कोसळला आहे.
चंदीगड- हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. धल्ली बोगद्यात डोंगराचा काही भाग कोसळल्याने चंदीगड-सिमला महामार्ग ठप्प झाला आहे. या दरडीखाली 6 गाडया अडकल्या आहेत. यात किती प्रवासी आहेत याची माहिती समजू शकलेली नाही. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले असून वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न सुरु  आहेत. 
 
महामार्गावर वाहतूक कोंडी
- पावसामुळे डोंगराचा एक मोठा हिस्सा तुटून राष्ट्रीय महामार्गावर कोसळला आहे. डोंगराचा कोसळलेल्या भागाची माती ही एका इमारतीत आणि मंदिरातही घुसली आहे. दरड कोसळल्यानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
- चंदीगड-मनाली महामार्गावर शुक्रवारी दरड कोसळली होती. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात मंडीत अशाच घटनेत 48 जणांचा मृत्यू झाला होता.
 
मान्सूनमध्ये  289 जणांनी गमावला आपला जीव
- हिमाचल प्रदेशात पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये 289 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 
- सरकारने आतापर्यंत यासाठी 193 कोटी रुपये खर्च केले आहेत. ऑगस्टपर्यंत या घटनांमुले 634 कोटी रुपयाच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...