आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heavy Mortar Shelling And Firing By Pakistan At LOC, Rescue Over 12 School Children, Soldier Martyred

जम्मू-काश्मिर: पाकिस्तानच्या गोळीबारात 6 तास अडकले 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्या फायरिंगमध्ये शेकडो शालेय विद्यार्थी अडकले होते. - Divya Marathi
पाकच्या फायरिंगमध्ये शेकडो शालेय विद्यार्थी अडकले होते.
श्रीनगर- जम्मू-काश्मिरात राजौरी, पूंछ व कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भागांत पाकिस्तानने तुफान गोळीबार केला. यात राजौरी आणि नौगाममध्ये दोन जवान शहीद झाले. दुसरीकडे, राजौरीच्या तीन शाळांतील २१७ विद्यार्थी आणि १५ शिक्षक सुमारे सहा तास पाकच्या गोळीबारात अडकून पडले. जिल्हा प्रशासनाने त्यांना बुलेटप्रूफ गाड्या आणि बसमधून सुरक्षितस्थळी हलवले. मुलांच्या सुरक्षेकडे पाहता राजौरीच्या मंजाकोट आणि नौशहरा सेक्टरमधील सर्व शाळा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. 

पाककडून सीमेवर डागलेले तोफगोळे जागोजागी फुटत असताना या धुमचश्क्रीत पोलिस आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांना वाचवले. भवानी हायस्कूलमधून १५०, कलाडीच्या माध्यमिक शाळेतून १२ आणि सायरच्या हायस्कूलमधून ५५ मुलांना काढण्यात आले. भवानीच्या शाळेवर तर थेट तोफगोळे आदळत होते.
 
घुसखोरीचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
- बांदीपुरा येथे मंगळवारी पाकिस्तानने जोरदार फायरिंग केली. याच फायरिंगच्या आड दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लष्कराने तो यशस्वीरित्या उधळून लावला आहे. 
- घुसखोरांना लष्कराने इशारा देताच त्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यास भारतीय सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. याच प्रत्युत्तरात्मक कारवाईमध्ये 2 दहशतवादी ठार झाले. संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी ही माहिती दिली. 
- गुरेज सेक्टरमध्ये सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय सुरक्षा रक्षक तुटून पडल्यानंतर त्या सर्व घुसखोरांना पाकिस्तान परत जावे लागले. तरीही, सीमा आणि एलओसी परिसरात संशयित घुसखोरांचा शोध सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...