आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगेने धोक्याची पातळी ओलांडली, 10 हजार लोक प्रभावित; गल्लीत चिता, आरती छतावरुन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिकर्णिका घाटावरील महास्मशान आणि हरिश्चंद्र घाट पाण्याखाली गेला आहे. वाराणशीच्या गल्ल्यांमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. - Divya Marathi
मणिकर्णिका घाटावरील महास्मशान आणि हरिश्चंद्र घाट पाण्याखाली गेला आहे. वाराणशीच्या गल्ल्यांमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे.
वाराणसी - गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गुरुवारी रात्री गंगेची पाणी पातळी जवळपास 71.48 मीटरवर पोहोचली. त्यानंतर आसपासच्या परिसरात पाणी भरले आहे. सगळेच घाट पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे गल्यांमध्ये चिता जाळण्यात येत आहेत. गंगा आरती छतावर उभे राहून केली जात आहे. गल्लीबोळामध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांच्या येण्या-जाण्यासाठी बोटी चालवल्या जात आहेत. पुरामुळे आतापर्यंत 10 हजार लोक प्रभावित झाले आहेत.

नागरी वस्तीत, गल्लीबोळामध्ये शिरले पाणी
- गेल्या 24 तासांत गंगेच्या पाणी पातळीत ताशी 3 ते 4 सेंटी मीटरने वाढ होत असल्याची नोंद आहे. नागरी वस्ती आणि गल्ली-बोळांमध्ये पाणी वाढत चालले आहे.
- रात्री 10 वाजतापर्यंत गंगेची पाणी पातळी जवळपास 71.48 मीटरवर पोहोचली होती. सायंकाळी 5 वाजता घेतलेल्या नोंदीनूसार पाणी पातळी 71.11 मीटर होती. रात्री 12 पर्यंत त्यात झपाट्याने वाढ होऊन 71.48 मीटरवर पाणी गेले.
- गंगेचे आतापर्यंतचे रेकॉर्ड 73.90 मीटर आहे. 1978 मधील हा आकडा आहे.

मणिकर्णिका घाटा पाण्याखाली, गल्ल्यांमध्ये चितांना अग्नी
- मणिकर्णिका घाटावरील महास्मशान आणि हरिश्चंद्र घाट पाण्याखाली गेला आहे. मृतांवर वाराणशीच्या गल्ल्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत.
- असे म्हटले जाते की मणिकर्णिका घाट हा जगातील एकमेव असा घाट आहे जिथे दिवसातील 24 तास चिता जळत असतात.
- या स्थानाबद्दल अशी अख्यायिका आहे की देवी पार्वती स्वतः मृत आत्म्याला ओटीत घेते आणि भगवान शंकर तारक मंत्र देऊन मोक्ष प्रदान करतात.
सर्व घाट पाण्याखाली, आरती छतावरुन
- दश्वाश्वमेध आणि शीतलघाट येथे गंगा आरती होत असते, मात्र सर्वच घाट पाण्याखाली गेल्याने येथील गंगा आरती सध्या छतावरुन केली जात आहे.
- गंगेच्या जवळील मारुती नगर, गंगोत्री विहार, सामने घाट, रामानुजनगर, सत्यमनगर, महेशनगर परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

वाराणसी: गंगेची पाणी पातळी (मीटरमध्ये)
#वॉर्निंग लेव्हल- 70.262
#डेंजर लेव्हल- 71.262
#हायस्ट लेव्हल- 73.901 (वर्ष 1978)
#आजची स्थिती - 71.48
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुठे रचल्या जात आहे चिता, काशी झाली पाणी-पाणी
बातम्या आणखी आहेत...