आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे तेलंगणात पूरस्थिती, हैदराबादेत लष्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सखल भागांचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून गंभीर पूरपरिस्थितीमुळे हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात लष्कराच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या. हैदराबादच्या बेगमपेठ, निझामपेठ व हकीमपेठ भागात आणि रंगारेड्डी जिल्ह्याच्या अलवल भागात मदत व बचाव कार्यासाठी लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. बृहन्हैदराबाद महानगरपालिकेत लष्कराने नियंत्रण कक्षही स्थापन केला. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. हैदराबादेत ६० सदस्यांचे एनडीआरएफचे पथकही तयार ठेवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...