धर्मपूर (हिमाचल) - देशाच्या पर्वतीय भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हिमाचल, जम्मू-काश्मीरला सर्वाधिक फटका बसला. मंडी जिल्ह्याच्या धर्मपूरमध्ये शनिवारी सकाळी ढगफुटी झाली. ढिगाऱ्याखाली दबल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
- बसस्टॉपमधील चार बस वाहून गेल्या. छतावर झोपलेले ६ जण वाचले.
- हिमाचल, उत्तराखंडात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरडी कोसळल्याने जम्मू-श्रीनगर महामार्ग पुन्हा बंद. अमरनाथ यात्राही रोखली.
वायुसेनेने २१ ब्रिटिश आणि एका फ्रेंच नागरिकाला वाचवले हवाई दलाने लेहमध्ये खराब हवामानामुळे अडकलेल्या २१ ब्रिटिश नागरिकांना आणि एका फ्रेंच महिलेला सुरक्षित बाहेर काढले.५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व नद्यांना पूर आला आहे. हवाई दलाला ६ ऑगस्टला मर्खा खोऱ्यात हा गट अडकल्याची माहिती मिळाली होती. हवाई दलाच्या ‘सियाचीन पायोनियर्स’ युनिटने दोन दिवसांत ही कामगिरी फत्ते केली.