आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, तीन ठार, अनेक बेपत्ता, चारधाम यात्रेवर परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/श्रीनगर/देहरादून- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) जम्मूच्या एकदिवसीय दौर्‍यावर आहेत. राज्याचे माजी अर्थमंत्री गिरधारी लाल डोगरा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहाणार आहेत. राज्यासाठी 70 हजार कोटी रुपयांच्या योजनेची नरेंद्र मोदी घोषणा करणार आहेत. मात्र, मोदींच्या दौर्‍यापूर्वीच राज्यात ढगफुटी आणि मुळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गजवळ ढगफुटीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक मुलगी आणि दोन भाविकांचा समावेश आहे. घरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जण वाहून गेले आहेत.
काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे उडाली दाणादाण...
सोनमर्गजवळील कुलान आणि गगनगीर गावात काल, गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता ढगफुटीमुळे अनेक घरे वाहून गेली. तसेच 15 वर्षीय इकरा नजीर हिच्यासह दोन अमरनाथ यात्रेकरुंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात गारा पडल्या आहेत. रात्री उशीरापर्यत मुसळधार पाऊस सुरुच होता.

शेषनाग पडावावर ढगफुटीचे संकट कोसळले आहे. पाच हजार यात्रेकरू अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. बालटाल आणि पहेलगाम भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामान आणि पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आला आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमधील परिस्थिती गंभीर...
हिमाचलमधील कुल्लूमध्ये देखील ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. त्याबरोबर उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे चारधाम आणि हेमकुंड साहिबचे यात्रेकरुंवर नैसर्गिक संकट कोसळले आहेत. भूस्खलन होण्याच्या भीतीमुळे चमोली, उत्तरकाशी आणि रुद्रप्रयागमध्ये यात्रेकरुंना थांबवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पुढील सूचना मिळेपर्यत थांबवण्यात आली आहे.
देहरादूनमधील कालसी भागातील एका दाम्पत्यासह त्यांचा चिमुकला वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळापासून 400 मीटर अंतरावर दोघांचा मृतदेह सापडले असून चिमुकल्याला वाचवण्यात आले आहे.
हवामान विमागाचा इशारा
उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये 17, 18 आणि 19 जुलैला मुसळधार पाऊसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. वायव्य हिमालयात बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, देहरादून, पौडी, अल्मोडा, नैनीताल आणि पिथोरागडमध्येही पावसामुळे हाहाकार उडाला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
(फोटो - अंकुर सेठी)