आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात पूर: टेकडीवर अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावून आली गुजरातची रेस्क्यू टीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रभागा नदीच्या पुलावर अडकलेली बस. - Divya Marathi
चंद्रभागा नदीच्या पुलावर अडकलेली बस.
जयपूर/झालावाड (राजस्थान) - झालावाड जिल्ह्यातील चंगेरी गावात रविवारी सकाळी कालीसिंध नदीला पूर आला. यामुळे एका टेकडीवर 24 जण अडकून पडले, त्यांना रविवारी रात्री सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. झालावाडमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथे अनेक गावांचे जणू बेट तयार झाले आहे.
कालीसिंध नदीने रविवारी रौद्ररुप धारण केल्याने, झालावाडपासून आठ किलोमीटर अंतरावरील चंगेरीगाव चहूबाजूंनी पाण्याने वेढले गेले होते. येथे 24 जण अडकलेले होते. नदीच्या रौद्ररुपामुळे मदत पथकाला पूरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येणे शक्य नव्हते. त्यामुळे गुजरातहून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली आणि उशिरा रात्री गावकऱ्यांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आले.
तज्ज्ञ पथकाने दाखवली हिंमत
कालीसिंध नदीच्या वेगवान प्रवाहापुढे मदत पथक निष्प्रभ ठरले होते. स्थानिक रेस्क्यू टीमने हात वर केले. त्यानंतर गुजरातहून आलेल्या रेस्क्यू टीमने वेगवान प्रवाहात नाव उतरवून चंगेरीपर्यंत जाण्याचे धाडस दाखवले. पथकाने एक-एक करुन सर्व ग्रामस्थांना तिथून सुरक्षीतस्थळी हलवले.

पाण्यात उतरवली बस, प्रवाशी अडकले
राजस्थानमध्ये काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. चंद्रभागा नदीला शुक्रवारी पूर आला. त्या पूरात राज्याच्या परिवहन विभागाची जयपूरहून भोपाळला जाणारी बस अडकली होती. त्यात 60 प्रवाशी होती. समोर नदीला पूर आलेला दिसत असताना चालकाने बस पाण्यात उतरवली होती. यामुळे पुलावर मधोमध बस अडकून पडली. बस कधीही वाहून जाईल अशा स्थितीत होती. मात्र, बचाव पथक वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्याने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.
नऊ वर्षांनंतर कालीसिंध नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कालीसिंध नदीने नऊ वर्षांनतर धोक्याची पातळी ओलांडली आहे. झालावाडमध्ये याआधी 2006 मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. खंडिया गावातील धनवाडा भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेकांनी घरे सोडून जाणेच योग्य समजले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांनी उंचावर असलेल्या देवनारायण मंदिरात आश्रय घेतला आहे. पावसाळी निवाऱ्यांमध्येही अनेक कुटुंब थांबली आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो.