आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: पंजाबमध्ये मुसळधार पाऊस, ब्रिजखाली अडकली स्कूल बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिजखाली अडकलेल्या स्कूलबसला बाहेर काढताना जेसीबी - Divya Marathi
ब्रिजखाली अडकलेल्या स्कूलबसला बाहेर काढताना जेसीबी
लुधियाना- पंजाबमधील लुधियानासह काही जिल्ह्यांना शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपले. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांनी मोठी तारांबळ उडाली आहे.

लुधियाना शहरातील एका ब्रिजखाली पाणी भरल्याने एक स्कूल बस अडकली. तिला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पाणी उपसण्यासाठी गेलेली फायर ब्रिगेडची गाडी चिखलात अडकून पलटी झाली.

दरम्यान, लुधियानासह आजूबाजुच्या परिसरात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. शहरात अनेक भागात पाणी तुंबल्यामुळे त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, पंजाबमध्ये पावसाने उडवली नागरिकांचे धांदल