आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू-आंध्रात \'वरदा\'चा तडाखा; पेट्रोल पंप आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचे छत कोसळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूसह आंध्रप्रदेश सोमवारी 'वरदा' चक्री वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. ताशी 192 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले. वादळामुळे चेन्नई हाहाकार उडाला असून दोघे ठार झाल्याचे वृत्त आहे. अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले आहेत. पेट्रोल पंप आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचे छत कोसळले आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहेत. चेन्नई अनेक उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

रिपोर्ट्सनुसार, चेन्नईतील हयात हॉटेल, रेल्वेचे प्लॅटफॉर्मचे छत कोसळले आहे. दुसरीकडे, आंध्रप्रदेशातील सुल्लुरपेटामध्ये एक पेट्रोल पंपचे मोठे नुकसान झाले आहे. पंपाचे छत कोसळले आहे. पेट्रोलचा एक टॅकर उलटल्याचे वृत्त आहे. आर्मी आणि एनडीआरएफने बचाव कार्य सुरु केले आहे. पुढील 12 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

6 वाजेपर्यंत सबअर्बन नेटवर्क बंद...
- रेल्वेचे एडीजी (पीआर) अनिल सक्सेना यांनी सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत चेन्नई सबअर्बन रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
- त्याचप्रमाणे चेन्नईला येणार्‍या काही एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय चेन्नईहून सुटणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- रेल्वेचे अधिकारी‍ स्टेशन आणि कंट्रोल रूमवर पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
- चेन्नई एअरपोर्टवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची उड्डाणे थांबवण्यात आले आहेत. ।
- एनडीआरएफचे अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशात 6 तर तामिळनाडूत 7 पथके पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत 7000 लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहेत.
- चेन्नईत आर्मीचे जवान पोहोचले असून त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरु केले आहे.

वादळी वार्‍याने ऑईलचे टॅंकर उलटले..
- आंध्र प्रदेशातील सुल्लुरपेटा भागात वादळी वार्‍यामुळे ऑईलचे एक टॅंकर उलटले.
- त्यातप्रमाणे शेकडो वृक्ष उन्मळून पडली आहेत. वृक्ष पडल्याने गाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे.
- एनडीआरएफचे डीजी आर.के.पचनंदा यांनी सांगितले की, विजेचे पोल कोसळले आहेत. विजेता तारा तुटल्या आहेत. काही भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, वरदा चक्रीवादळाचा तडाखा बसलेेल्या चेन्नईतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...