आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद पाण्यात, गुंटूरमध्ये रात्री हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन, 7 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या तीन जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. परतीच्या या पावसामुळेे हैदराबाद, गुंटूर आणि आरआर जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साजले असून काही भागत घरात पाणी घुसले आहे. सात जणांंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 10 लाख लोक प्रभावित झाले आहेत.

हैदराबादेेत मागील 16 वर्षात पहिल्यांदा विक्रमी पाऊस झाला. 6 तासांत 20 सेंटीमीटर पावसाची नोंंद झाली.

गुंटूरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन
गुंटूर जिल्ह्यात 10 हजारांंहून जास्त नागरिकांंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 7 जणांचा मृत्यू झााल्याची माहिती मिळाली आहे. गुंटूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संंपर्क तुटला असून बुधवारी रात्री हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले.

हैदराबादेत रेकॉर्ड ब्रेेक पाऊस...
- हैदराबादेेत बुधवारी रात 11 वाजता मुसळधार पाऊस सुरु झाला. पहाटे 4 वाजेपर्यंत 110 ते 160 सेंटीमीटर पावसाची नोंंद झाली. या पावसाने मागील 16 वर्षांंचे सर्व रेकॉर्ड ब्रेेक केले आहेत.
- नागरी वसाहतींंमध्ये 7 ते 8 फुटापर्यंत पाणी तुंंबले आहे. 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
- गुंटूरमधील शेकडो घरांमध्ये पाणी घुसले आहे. एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य सुरु केले आहे.
- रात्री रेस्क्यू ऑपरेशन चालवून हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेे.

मुसळधार पावसाने मुंबईकर बेहाल...
- मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात शहरात 84.7 मिमी पावसाची नोंंद घेण्यात आल‍ी आहे.
- मुंंबई पश्चिममध्ये 95,89 तर पूर्व भागात 76.27 मिमी पाऊस झाला.
- पालघर, वसई, ठाण्यात पाऊस सुरु आहे.

8 राज्यांत पावसाचा अंदाज...
- पुढील 48 तासांत उत्तराखंड, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस होईल असा अंंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
- हरियाणा, पंजाब, राजस्थानातील काही शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
- मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काही भागात हलक्या स्वरुपाचा पावसाचा अंंदाज वर्तवला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, हैदराबादसह गुंटूरमधील स्थिती...
बातम्या आणखी आहेत...