आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाट धुक्‍यामुळे बचावकार्यात पुन्‍हा अडथळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमध्‍ये अडकलेल्‍या भाविकांच्‍या सुटकेसाठी आता केवळ काही तासांचा अवधी लष्‍कराकडे आहे. केदारनाथ आणि गौरीकुंडमध्‍ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्‍यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला असून या भागात हेलिकॉप्‍टरद्वारे मोहिम थांबविण्‍यात आली आहे. दुपारी 12 वाजताच्‍या सुमारास धुके कमी झाले होते. परंतु, आता पुन्‍हा दाट धुके पसरले आहे. त्‍यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. आतापर्यंत 82 हजार लोकांना हलविण्‍यात आले आहे. परंतु, अजूनही 22 हजार लोक अडकल्‍याचा अंदाज आहे. परंतु, पाऊस वाढल्‍यास अडचणी वाढू शकतात.

हवामान बिघडल्‍यामुळे हेलिकॉप्‍टर जमिनवरच आहे. परंतु, सैन्‍याच्‍या बचाव मोहिमेवर परिणाम झालेला नाही. जवानांनी जमिनीवरुनच मोहिम सुरु ठेवली आहे. आतापर्यंत सकाळपासून 470 लोकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यात आले आहे. विशेष बचाव पथक उंच ठिकाणी पोहोचले असून आता तिथेही मदत मिळू लागली आहे. या जवानांकडून सॅटे‍लाईट फोनचा वापर करण्‍यात येत आहे.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, पिंडारी ग्‍लेशियरमधून अनेक लहान मुलांना वाचविण्‍यात आले आहे. तसेच रुद्रप्रयागचा रस्‍ता सुरु करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे अडकलेल्‍या लोकांना लवकरच सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्‍यात येईल.