आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Toll Due To Heavy Rains In Tamil Nadu Rises Up To 105

तामिळनाडूनंतर आंध्र, कर्नाटकात पावसाचा कहर, आठवड्यात 105 जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूमध्‍ये आठवड्यापासून सुरू असलेल्‍या पावसामुळे आतापर्यंत 105 जण मृत्‍यूमुखी पडले आहेत. सोमवारच्‍या वादळी वा-यामुळे तामिळनाडूशिवाय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जोरदार पाऊस झाला. तामिळनाडूमध्‍ये 9 नोव्‍हेंबरपासून जोरदार पाऊस होत आहे.
पावसाचा परिणाम
> वादळी पावसामुळे चेन्‍नईसह इतरही शहरं प्रभावित झाली आहेत.
> तामिळनाडूच्‍या 24 जिल्‍ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्‍यात आली आहे.
> हवामान खात्‍याने मंगळवारी सायंकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे.
> कांचीपुरम आणि तिरुवल्लुर ही शहरे जलमय झाली आहेत.
> तामिळनाडूमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्‍यामुळे शहरं आणि ग्रामीण भागाचा
संपर्क तुटला आहे.
> राज्यातील काही भागात रेल्‍वे आणि रस्‍त्यावरील वाहतूक पुर्णपणे ठप्‍प झाली आहे.
पाऊस थांबण्‍याची चिन्‍हे नाहीत
हवामानाचा अंदाज वर्तवणारे संकेतस्‍थळ स्कायमेटच्‍या माहितीनुसार, चेन्नईमध्‍ये मागील 24 तासात 256 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुन्‍हा येथे जोरदार पावसाची शक्‍यता सांगितली आहे. त्‍यामुळे आणखी दोन ते तीन दिवस तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्‍यता आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पावसामुळे तामिळनाडूचे असे झाले हाल..