आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड:हेलिकॉप्‍टरचे इमरजेंसी लॅडिंग, धर्मशाळांच्या प्रत्येक खोलीत मृतदेह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडातील ढगफुटीनंतर आलेल्या महाप्रलयाला आज 12 दिवस झाले असले तरी अजूनही 2500 लोग बद्रीनाथमध्ये अडकले आहेत. केदार घाटीत मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले असून सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. दूसरीकडे रामवाडामधील हॉटेल आणि धर्मशाळांमधील प्रत्येक खोलीत चार-पाच मृतदेह पडले आहेत. रामवाडा ते केदार घाटी मार्गावर तब्बल दोन हजार मृतदेह विखूरलेल्या अवस्थेत पडून आहेत.

पाऊस ओसरल्यामुळे बचावकार्य पुन्हा सुरु झाले आहे. आज (शुक्रवारी) 17 हेलिकॉप्‍टर बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले. डोंगराळ भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले जात आहे. यादरम्यान हर्षिल हेलिपॅडवर 'पवनहंस' ताफ्यातील एका हेलिकॉप्‍टरचे इमरजेंसी लॅंडिंग करण्‍यात आले.

आयटीबीपीचे जनसंपर्क अधिकारी दीपक पांडेय यांनी सांगितले, की केदारनाथ घाटीतील शोध मोहिम पूर्ण झाली आहे. आता स्थानिक लोकांना मदत साहित्य पाठवले जात आहे. बद्रीनाथ येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम सुरु आहे.